ये दिल मांगे 'राहुल' ; राहुल द्रविड होणार टिम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक

16 Oct 2021 13:48:34

rahul dravid_1  
 
 
मुंबई : भारतासह जगभरातील क्रिकेटमध्ये आपली 'दि वाॅल' अशी छाप पाडणारा भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड आता टिम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक रुपात आपल्याला दिसणार आहे. गेली अनेकवर्षे याबाबत क्रीडा प्रेमींमध्ये चर्चा होती. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला राहुल द्रविडही उपस्थित होता. यावेळी तिघांमध्ये मुख्य प्रशिक्षक पदासाठी चर्चा झाली. त्यानंतर द्रविडने मुख्य प्रशिक्षक होण्यास होकार दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत आता अधिकृतरीत्या घोषणा कधी होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
 
आयसीसी टी-२० विश्वकरंडकानंतर सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा करार संपत आहे. रवी शास्त्री यांना मुदतवाढ मिळावी, अशी बीसीसीआयची भूमिका आहे. पण रवी शास्त्री स्वतः अशी मुदतवाढ मिळण्यासाठी इच्छूक नाहीत. त्यांनी यासंदर्भात बीसीसीआयला आपली भूमिका स्पष्ट केली. यानंतर राहुल द्रविडचे नाव चर्चेत आले. मिळालेल्या माहितीनुसार , गांगुली - जय शहा यांच्या बैठकीमध्ये राहुलने पदासाठी होकार दिल्याची बातमी समोर आली. यानंतर सोशल मिडियावरही त्याच्या नावाची चांगलीच चर्चा होत आहे. 'ये दिल मांगे राहुल' म्हणत क्रीडा प्रेमींनी आपला आनंद व्यक्त केला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0