बांगलादेशमध्ये धर्मांधांचा हैदोस ; इस्कॉन मंदिरावर हल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2021
Total Views |

Bangladesh_1  H
 
 
 
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये धर्मांधांनी हैदोस घातला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी हिंदू मंदिर, धार्मिक स्थळांवर हल्ले करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा देऊनही हल्ले सुरूच आहेत. काही धर्मांधांच्या जमावाने नौखालीमधील एका इस्कॉन मंदिरावर हल्ला केला. यावेळी तेथील सदस्य पार्थ दास यांची हत्या करण्यात आली. भारतासह जगभरातून या गह्तानेचा निषेध करण्यात येत आहे.
 
 
 
 
 
इस्कॉनने ट्विट करून या घटनेची माहिती दिली. इस्कॉनने बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदतीचे आवाहन केले आहे. या हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी इस्कॉनने केली आहे. इस्कॉनचे राधारमण दास यांनी ट्विट करून म्हंटले आहे की "पार्थ दास हे बेपत्ता होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह तलावात तरंगताना दिसला. त्यांना बेदम मारहाण करून क्रूरपणे हत्या करण्यात आली."
 
 
 
 
 
नवरात्री उत्सवात कथित इशनिंदेच्या मुद्यावरून बांगलादेशात हिंदू मंदिरांवर काही धर्मांधांनी हल्ले केले. त्यानंतर उसळलेल्या दंगलींत तीन जनना प्राण गमवावे लागले. सध्या २२ जिल्ह्यांमध्ये निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. हिंसाचारात ६० जणहून अधिक जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यावरून बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. या हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@