मी कॉंग्रेसची पूर्णवेळ अध्यक्षा : सोनिया गांधी

16 Oct 2021 15:12:35

Sonia Gbadhi_1  
नवी दिल्ली : पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरू असून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री अशोक गेहलोत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांच्यासह पक्षाचे ५२ वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित आहेत. "प्रत्येक पक्षाच्या सदस्याला काँग्रेसचे पुनरुज्जीवन हवे आहे. काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी आत्मसंयम आणि शिस्तपणा गरजेचा आहे. तसेच एकता आणि पक्षाचे हित सर्वोपरी ठेवणे आवश्यक आहे. मी पक्षाच्या नेत्यांशी खुल्या मनाने बोलते. त्यांनी माध्यमांद्वारे माझ्याशी बोलण्याची गरज नाही, असे सोनिया गांधी बैठकीत ठणकावले आहे.
 
 
 
पुढे सोनिया गांधी म्हणाल्या की, "जर तुम्ही मला म्हणण्याची परवानगी दिली, तर मी म्हणते की मी काँग्रेसची पूर्णवेळ अध्यक्षा आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणुका घ्यायच्या होत्या. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे त्या घेऊ शकलो नाही. आता पुढील वेळापत्रक लवकर जारी केले जाईल."लखीमपूर खेरी घटनेवर सोनिया गांधी यांनी भाष्य केले. सोनिया गांधींनी पक्षातील टीकाकारांना विशेषत: ‘जी -२३’ नेत्यांना उद्देशून पूर्णवेळ आणि व्यावहारिक काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांची भूमिका स्पष्ट केली. ‘जी -२३’ चे नेते बऱ्याच काळापासून संघटनेत व्यापक बदल आणि प्रभावी नेतृत्वासाठी निवडणुका घेण्याबाबत भाष्य करत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0