गोव्यात शिवसेनेला मोठा धक्का ; दसऱ्या दिवशीच उपाध्यक्षाने दिली सोडचिठ्ठी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2021
Total Views |

Goa_1  H x W: 0
पणजी : एकीकडे शिवसेना आपला दसरा मेळावा साजरा करत असताना दुसरीकडे गोव्यात सेनेला मोठा धक्का बसला आहे. दसऱ्याच्या दिवशीच शिवसेनेच्या गोवा राज्य उपाध्यक्ष राखी नाईक यांनी पदाचा तसेच पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला. शिवेसेनेसाठी गोव्याच्या राजकारणात हा मोठा धक्का मानला जात आहे. राखी नाईक यांनी सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप सुद्धा केले आहेत.
 
 
राखी नाईक चार वर्षांपासून शिवसेनेसाठी काम करत होत्या. "शिवसेनेला गोवेकरांच्या बाबतीत तळमळ दिसत नाही. शिवसेनेला गोव्यात काहीही भवितव्य नाही. पक्षाचे जे नेते गोव्यात येतात त्यांना गोव्याच्या प्रश्नांबाबत गांभीर्य दिसत नाही", असे आरोप त्यांनी केले. भविष्याबद्दल बोलताना नाईक म्हणाल्या की "मी माझ्या सांगे मतदारसंघातील तसेच संपूर्ण गोव्याचे प्रश्न घेऊन सध्या तरी स्वतंत्रपणेच पुढे जाणार आहे. कोणत्याही पक्षाबद्दल विचार केलेला नाही."
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@