राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांचा ज्योतिषावर विश्वास कसा बसला?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2021
Total Views |

nehu 2_1  H x W

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) यंदापासून ‘ज्योतिष’ विषयाचा पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. यावर टीका होत आहे. ज्योतिष विषय अधिकृत अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केल्यामुळे अनेक जण धास्तावले आहेत. काहीतरी भयंकर घडणार आहे, अशी त्यांची समजूत आहे किंवा ते तसे दाखवत आहेत. मात्र, यानिमित्ताने मग असाच प्रश्न उपस्थित होतो की, राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांचा ज्योतिषावर विश्वास कसा बसला?




जवळपास सर्व सुशिक्षित माणसे वर्तमानपत्र वाचतात. दर रविवारच्या मराठी, गुजराती, इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये साप्ताहिक भविष्याचे सदर आवर्जून वाचणारे अनेक लोक आहेत. भारतामधील आघाडीचे इंग्रजी दैनिक ‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये बेजान दारूवाला या सुप्रसिद्ध ज्योतिषाचे साप्ताहिक ज्योतिषाचे सदर अनेक वर्षे येत असे, तर रेल्वे स्टेशन्सवर पुढील वर्षाचे वेगवेगळ्या राशींचे ज्योतिष सांगणारी पुस्तकेदेखील विक्रीसाठी ठेवली जात. आजदेखील जवळजवळ सर्व इंग्रजी व प्रादेशिक भाषांच्या वर्तमानपत्रांमध्ये रोजचे राशिभविष्य व साप्ताहिक राशिभविष्य नियमितपणे येत असते. इंटरनेटच्या आधुनिक युगातदेखील भविष्य वर्तविणार्‍या वेबसाईट्स आहेत. आपल्या देशामधील एक मोठा सुशिक्षितवर्गही ज्योतिषावर विश्वास ठेवतो व त्यानुसार आपले निर्णय घेत असतो.इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) यंदापासून ‘ज्योतिष’ विषयाचा पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. यावर टीका होत आहे. ज्योतिष विषय अधिकृत अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केल्यामुळे अनेक जण धास्तावले आहेत. काहीतरी भयंकर घडणार आहे, अशी त्यांची समजूत आहे किंवा ते तसे दाखवत आहेत.






काही आघाडीच्या वर्तमानपत्रांमध्ये या अभ्यासक्रमाविषयी पुढीलप्रमाणे वृत्तान्त प्रकाशित झाला आहे ः-इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात आता ज्योतिषशास्त्र शिकवण्यात येणार आहे. काही वर्षांपूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाने अशाच स्वरूपाचा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी केलेला प्रयत्न देशभरातील अभ्यासक आणि वैज्ञानिकांनी हाणून पाडला होता. ग्रहतार्‍यांचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो, यावर हा अभ्यासक्रम बेतलेला आहे. ज्योतिषशास्त्र, ग्रहतार्‍यांचे परिणाम, कुंडली याबाबत अनेक मतभेद आहेत. मात्र, आता त्याला स्वतंत्र विद्याशाखेचा दर्जा देण्याचा घाट ‘इग्नू’ने घातला आहे. अभ्यासकांकडून जनजागृतीवर भर देण्यात येत असताना या अभ्यासक्रमात मात्र ‘ग्रहणांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम,’ असा घटक समाविष्ट करण्यात आला आहे. प्राचीन ऋषींची मते काय होती, त्याचा आधार घेऊन घटकांची मांडणी करण्यात आल्याचे ‘इग्नू’चे म्हणणे आहे. विज्ञानप्रेमींकडून सातत्याने याबाबतच्या दाव्यांना आव्हाने दिली जातात. त्यामुळे राष्ट्रीय विद्यापीठाने सुरू केलेला हा अभ्यासक्रम वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. यापूर्वी २००१ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने अशाच स्वरूपाचा अभ्यासक्रम सुरू केला होता. तेव्हा शास्त्रज्ञांनी अशा स्वरूपातील अभ्यासक्रमाला विरोध केला होता. त्यानंतर हा अभ्यासक्रम रद्द करण्यात आला. ज्योतिषशास्त्राचा हा अभ्यासक्रम तातडीने रद्द करावा, अशी मागणी ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने (अंनिस) केली आहे. या अभ्यासक्रमात भारतीय ज्योतिषाचा परिचय आणि इतिहास, सिद्धान्त, ज्योतिष आणि काळ, पंचांग, मुहूर्त, कुंडली, फलविचार, गणित, ग्रहणवेध आणि यंत्र, संहिता ज्योतिष, ज्योतिर्विज्ञान, वेदांग ज्योतिष हे अभ्यासाचे विषय असणार आहेत.





‘इग्नू’च्या अभ्यासक्रमात काय आहे, हे एक नजर टाकली तरी कळेल. या अभ्यासक्रमातील अशास्त्रीयता पण लक्षात येईल. या अभ्यासात पंचांग, मुहूर्त, कुंडली निर्माण, फलविचार, ग्रहणवेध अस विषय दिलेले आहेत. एखाद्या गोष्टीला वैज्ञानिक आधार तपासण्यासाठी त्यामधील काही मूलभूत गृहितके तपासणी होऊन सिद्ध झालेली असावी लागतात. ज्योतिषामधील जी प्रमुख तीन गृहितके समजली जातात, त्यावर हा अभ्यासक्रम आधारित आहे. यात पहिले गृहितक असे आहे की, आकाशातील ग्रहगोलांचा मानवी जीवनावर सतत परिणाम होत असतो. दुसरे गृहितक असे आहे की, हा परिणाम त्या व्यक्तीच्या जन्मवेळेवर अवलंबून असतो आणि तिसरे गृहितक असे की, या सगळ्यावरून माणसाचे भविष्य ठरते आणि ते बदलतादेखील येते. कोणताही वैज्ञानिक आधार नसणार्‍या ‘फलज्योतिष’ या विषयाची पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा ‘इग्नू’चा मनसुबा धक्कादायक आहे. एकीकडे जग मंगळावर वस्ती करण्याचे स्वप्न पाहत असताना ग्रह, उपग्रह आणि तारे यांचे कडबोळे करून भविष्याचा फसवा वेध घेण्याच्या वृत्तीला सरकारनेच खतपाणी घालावे, हे उचित नाही.आयुर्वेद आणि ज्योतिष हे दोन्ही एका आध्यात्मिक विद्येपासून निर्माण झालेले आहेत. आयुर्वेद शारीरिक दुखण्यांचे निदान करतो व त्यावर उपचार करतो, ज्योतिष मनाच्या दुखण्यांचे निदान व उपचार करते. दोन्हीचा उपयोग करून आपल्याला जास्त सर्वसमावेशक उपचार करता येतात. आयुर्वेद आपल्याला शारीरिक बिघाडाविषयी दृष्टी देतो, तर ज्योतिषामुळे आपले जीवन दीर्घकालीन स्वरूपात कशा प्रकारचे असेल याची जाणीव होते.रत्नांचा वापर हजारो वर्षांच्या वैद्यकीय आणि ज्योतिषशास्त्रीय पद्धतीवर आधारित आहे. ज्ञानी ऋषींनी निर्माण केलेल्या योगाच्या पद्धतीचा भाग म्हणून रंग आणि मंत्रांच्या वापरासह हे एकत्रित केले आहे. रत्नांच्या भस्माचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो, याविषयी आयुर्वेदिक विषयामधील डॉक्टरांनी काळजीपूर्वक नोंदी ठेवलेल्या आहेत. यावरून असे दिसून येते की, वैदिक प्रणालीने प्राचीन, प्रदीर्घकाळ वापरात असलेली आणि सर्वाधिक प्रमाणित रत्नोपचार पद्धती जगापुढे सादर केली आहे. आधुनिक रत्नचिकित्सापद्धतीमध्ये या ज्ञानाचा काळजीपूर्वक विचार झाला पाहिजे. पुढील कल्पना प्राथमिक कल्पना आहेत. वैद्यकीय ज्योतिष हा एक जटील विषय असून, त्याचा अभ्यास होणे गरजेचे आहे.


 



वैदिक ज्योतिषशास्त्रात रत्नांचा संबंध ग्रहांशी असून, ग्रहांचा प्रभाव कमी करण्यासाठी रत्नांचा वापर होतो. अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रानुसार शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दोष दूर करण्यासाठी रत्नांचा वापर होतो. ज्योतिषशास्त्रीय चिकित्सेमधील ‘रत्नचिकित्सा’ ही एक मुख्य चिकित्सा आहे, ज्योतिषशास्त्रीय संकेतानुसार रत्नचिकित्सेचे स्वरूप निर्धारित केले जाते. महागडी व प्रभावी रत्ने धारण करण्याआधी, व्यावसायिक वैदिक ज्योतिषाकडून आपली जन्मकुंडली तपासून घेणे कधीही उत्तम!रत्नांचा प्रभाव भौतिक शरीरावर पडतो. मात्र, त्यांचा मुख्य परिणाम मन आणि प्राणावर होतो. यास्तव रत्नांचा संबंध दोषांसोबत जुळविता येत नाही. एखादे औषध घेतले असता रोगाचा परिणाम कमी होतो किंवा विशिष्ट प्रकारचे अन्न खाल्ले असता रोगाचा परिणाम कमी होतो, तसे रत्नांबाबत करता येत नाही. काही रत्ने प्राण किंवा मनाचे संतुलन साधून त्रिदोषांचा समतोल साधण्यास मदत करतात.ज्या धातूच्या अंगठीमध्ये रत्न बसविलेले असते, त्याप्रमाणे रत्नाचा प्रभाव पडतो. एकच रत्न सोन्याच्या अंगठीमध्ये बसविल्यानंतर जो परिणाम होतो, त्यापेक्षा वेगळा परिणाम चांदीच्या अंगठीमध्ये बसविल्यावर होतो. कारण, सोने उष्णता निर्माण करणारा धातू आहे व चांदी शीतलता निर्माण करणारा धातू आहे. एक दोष दूर करण्यासाठी वेगवेगळी रत्ने वापरता येतात. उदाहरणार्थ, वात दोष नष्ट करण्यासाठी माणिक, लाल प्रवाळ, पिवळा नीलमणी ही रत्ने वापरली जातात. अशा वेळी आपल्या जन्मकुंडलीसोबत जुळणारी रत्ने वापरावीत.वैदिक ज्योतिषामध्ये सांगितलेली रत्ने आयुर्वेदानुसार औषधस्वरूपातदेखील घेता येतात. तथापि, औषधाच्या स्वरूपात रत्नांचे सेवन करण्यासाठी त्यांच्यावर गुंतागुंतीच्या प्रक्रिया कराव्या लागतात, ज्यामुळे मानवी शरीरावर वाईट परिणाम होऊ नये. आजच्या आयुर्वेदिक औषधांमध्येदेखील रत्नांचा वापर केला जातो. ही औषधे अमेरिकेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. पण, आपण रत्नांचा उपयोग करून तयार केलेले पाणी घेऊ शकतो. त्यामध्ये आपण रत्न सेवन केले असे होत नाही. रत्ने अंगठीमध्ये, हातामध्ये किंवा गळ्यातील चेनमध्ये घातली जातात.






‘नाडी ज्योतिष’ हा हिंदू ज्योतिषशास्त्राचा भाग आहे. तामिळनाडू राज्यात नाडी ज्योतिष पूर्वापार वापरात आहे. या शास्त्रामध्ये अशी मान्यता आहे की, व्यक्तीचा भूतकाळ आणि भविष्यकाळ भूर्जपत्रांवरील ग्रंथांमध्ये पूर्वीपासूनच लिहून ठेवलेला आहे. व्यक्तीचे नाव, त्या व्यक्तीच्या आई-वडिलांची नावे, जोडीदाराचे नाव, जन्मदिनांक, जन्मकालीन ग्रहस्थिती यांची अचूक नोंद भूर्जपत्रांमध्ये आहे. जीवनातील चढउतार व त्यावरील उपाय यांचीदेखील माहिती या भूर्जपत्रांमध्ये आहे. नाडी ज्योतिषाद्वारेशरीरस्वास्थ्य, सांपत्तिक स्थिती, पारिवारिक स्थिती, शिक्षण, भावंडे अशा काही विषयांसंबंधी माहिती मिळते.ज्योतिषाचे प्रथम उल्लेख बॅबिलॉनमधील शिलालेखांमध्ये आढळतात. या शिलालेखांचा कालखंड इसवी सनपूर्व २०० आहे. ही विद्या पूर्वेकडे वापरात होती. मध्ययुगामध्ये ही युरोपमध्ये पोहोचली. दीर्घकाळ ज्योतिषविद्येचा उपयोग केवळ राजघराण्यामधील लोकांनाच होत असे. पंधराव्या शतकात छपाईतंत्राचा उगम झाल्यापासून हे ज्ञान हलके हलके जनसामान्यांपर्यंत पोहोचू लागले. तथापि, सोळाव्या शतकामध्ये पंचांगांचा प्रसार झालेला असल्यामुळे भविष्य सांगणारे सर्वत्र दिसू लागले होते. इंग्लंडची राणी एलिझाबेथ (पहिली) हिच्या पदरी जॉन डी नावाचा दरबारी ज्योतिषी होता. फ्रेंच राणी कॅथेराईन, नॉस्ट्राडेमस या प्रख्यात ज्योतिषाचा सल्ला घेत असे.शेकडो वर्षांपासून ज्योतिषविद्येच्या अचूकतेविषयी लोकांच्या मनात शंका असली तरी अनेकांनी या विद्येमध्ये काही तथ्य असल्याचे मान्य केले आहे. एखाद्या ज्योतिषाने कथन केलेले नाट्यपूर्ण भविष्य प्रत्यक्षात उतरले की, या प्राचीन शास्त्राविषयी पुन्हा एकदा श्रद्धा जागृत होते. इ. सन १६५१ मध्ये महान ज्योतिषी विल्यम लिली याने ‘लंडनच्या आगीविषयी’वर्तविलेले भविष्य खरे ठरले होते. स्पेनचा राजा चौथ्या फिलिपची मुलगी लहान असताना तिच्यासंबंधी भविष्य वर्तविण्यात आले होते की, या मुलीचा युरोपमधील सर्वात प्रभावशाली राजाशी विवाह होईल व त्यामुळे एक युद्ध टाळले जाईल. इ. सन १६६० मध्ये तिचा विवाह फ्रान्सचा राजा चौदावा लुईस याच्याशी झाला व परिणामी फ्रान्स आणि स्पेनमधील युद्धप्रसंग टळला.





१९ व्या शतकामध्ये भविष्यकथन करणार्‍या स्त्रियांचा उदय होऊ लागला होता. रोझा नावाच्या स्त्रीने ज्योतिषविद्येची संख्याशास्त्राशी सांगड घालून काही निष्कर्ष काढले होते. तिचा असा विश्वास होता की, शनीमुळे चेहर्‍यावर व शरीरावर काळे डाग येतात व गुरूमुळे तपकिरी डाग येतात.इ. सन १८७५ मध्ये एका विलक्षण स्त्रीद्वारे ‘थिऑसॉफिकल सोसायटी’ची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या जगभर शाखा आहेत. तिचे नाव मॅडम ब्लाव्हत्स्की होते. तिला आध्यात्मिक चिंतन आणि ब्रह्मांडाच्या गूढ रहस्यांविषयी मनन-चिंतन करण्यामध्ये आणि धर्म, तत्त्वज्ञान आणि विज्ञान यांच्यातील साम्यस्थळे शोधण्यात रस होता. माझा स्वामी सर्वज्ञ आहे, असा तिचा दावा होता. तिला बदनाम करण्याचे सर्व प्रयत्न होऊनदेखील तिच्या मृत्यूसमयी तिचे एक लाखापेक्षा जास्त अनुयायी होते.त्यांच्यानंतर त्यांचा वारसा अ‍ॅनी बेझंट यांनी पुढे चालविला. त्यादेखील आध्यात्मिक मनन-चिंतन करीत असत. त्यांना जाणीव होती की, ज्योतिषशास्त्र हे प्राचीन असूनदेखील बदनाम झालेले शास्त्र आहे. त्यांना हीसुद्धा जाणीव होती की, सूर्य-चंद्र आणि इतर ग्रह पृथ्वीवर व मानवांच्या शरीरावर प्रभाव पाडतात.अनेक लोकांनी गंभीरपणे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला. सखोल अभ्यासाअंती त्यांच्या असे लक्षात आले की, ज्योतिषशास्त्राने मांडलेले दावे ते सिद्ध करू शकत नाहीत किंवा खोटेदेखील ठरवू शकत नाहीत. तत्त्वज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ कार्ल जुंग याने असा निष्कर्ष काढला की, “ग्रहांचा मानवी वागणुकीवर देखील प्रभाव पडू शकतो.”फ्रेंच मानसशास्त्रज्ञ मिशेल गुक्वेलिन याने पाच देशांमधून ज्योतिषशास्त्राविषयी साहित्य जमविले होते. ज्योतिषशास्त्राला काही शास्त्रीय अधिष्ठान आहे का, हे शोधण्यासाठी त्याने २४ हजारांपेक्षा जास्त कुंडल्यांचा सखोल अभ्यास केला होता. त्याला हे मान्य करावे लागले की, ग्रह, जन्मकुंडली आणि व्यक्तींचे व्यवसाय यामध्ये काही विशिष्ट दुवे अस्तित्वात होते. उदाहरणार्थ धार्मिक विषयांशी निगडित व्यवसायांशी संबंधित स्त्री व पुरुषांच्या कुंडलीमध्ये गुरू ग्रह विशिष्ट स्थानी होता व खेळांशी संबंधित स्त्री व पुरुषांच्या कुंडलीमध्ये मंगळ ग्रह विशिष्ट स्थानी होता.





स्वित्झर्लंडमधील सुप्रसिद्ध ज्योतिषी कार्ल अर्नेस्ट क्रॅफिट याने ज्योतिषशास्त्र हे एक शास्त्र आहे, असे सिद्ध करणार्‍या वास्तव जीवनामधील अनेक उदाहरणांची नोंद केली होती. अशी अफवा होती की, तो हिटलरचा ज्योतिषी आहे. १९२३ साली हिटलरच्या खुनाचा प्रयत्न होईल, असे अचूक भविष्य त्याने वर्तविले होते. या कारणास्तव त्याला संशयित म्हणून अटकदेखील झाली होती. मात्र, त्याच्या भविष्यकथनाची सत्यता पटल्यामुळे म्हणा की, त्याच्याविरुद्ध पुरावे मिळाले नाही व तो उपयोगी माणूस आहे, असे राज्यकर्त्यांना वाटू लागले. यामुळे त्याला तत्कालीन जर्मन सरकारमध्ये बर्लिन येथे नोकरी मिळाली. नॉस्ट्राडेमेसच्या भविष्यकथनाच्या अनुषंगाने जर्मनीच्या बाजूने प्रचार करण्यासाठी त्याच्या ज्योतिषाच्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला गेला.१९४१ मध्ये कार्ल अर्नेस्ट क्रॅफिट याला बळीचा बकरा बनवून जर्मनीमधून ज्योतिषाचे नामोनिशाण संपविण्यासाठी वापरण्यात आले. जर्मनीमधील सर्व ज्योतिषांची माहिती एकत्र करण्यात आली. त्यांच्याकडील पुस्तके इत्यादी नष्ट करण्यात आली. त्यांच्यापैकी अनेकांकडून असे कबुलीजबाब घेण्यात आले की, यापुढे कधीही ज्योतिषशास्त्राशी संबंध ठेवणार नाही. मात्र, कार्ल अर्नेस्ट क्रॅफिटची सुटका होऊ शकली नाही. १९४५ मध्ये तो कैदेमध्येच मरण पावला.आपल्या देशातील एका मोठ्या समाजवर्गाची ‘ज्योतिष’ नावाच्या पारंपरिक ज्ञानावर श्रद्धा व विश्वास आहे. त्या पारंपरिक ज्ञानशाखेचा केवळ अभ्यासक्रम सुरू केला तर काहीतरी भयंकर होणार आहे किंवा झालेले आहे, अशा स्वरूपाची टीका होत आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणे किंवा न घेणे, पूर्णपणे ऐच्छिक आहे. या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रम सुरू करण्यालाच विरोध करणे लोकशाही तत्त्वाच्या विरोधी नाही का? समाजामधील एक मोठा वर्ग ज्या पारंपरिक विद्येला मानतो, त्यांच्या मूलभूत स्वातंत्र्यावर ही गदा नाही का?





आपल्या रोजच्या जीवनात ‘ज्योतिष’ या विषयाचा मोठा सहभाग नसला तरी घरामध्ये एखादे शुभकार्य उभे राहणार असले की, आपण ज्योतिषाकडे जाऊन बरेच काही जाणून घेण्यास उत्सुक असतो. या दृष्टीने पाहिले तर आपला ज्योतिषावर विश्वास असतो. ज्योतिषाची विश्वासार्हता किंवा महत्त्व हा नेहमीच चर्चेचा व वादाचा विषय राहिला आहे. राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांचा ज्योतिषावर विश्वास होता का? याविषयी काही जाणून घेऊया.‘द नेहरू इरा’ या पुस्तकात पत्रकार दुर्गादास लिहितात, “भारताचा स्वातंत्र्योदय कधी होईल यावर ज्योतिषांची भाकिते प्रकाश टाकू शकत नव्हती. भारताला स्वातंत्र्य कधी मिळेल, या प्रश्नाचे सावट सर्वोच्च नेत्यांवर होते. अनेक वर्षे मंत्रिपद भूषविलेले सत्यनारायण सिन्हा माझ्या परिचयाचे होते. त्यांच्याकडे ज्योतिषविषयक किश्शयांचा खजिना होता. सत्यनारायण सिन्हा आनंदी स्वभावाचे असून, त्यांना हिंदी साहित्याची आवड होती व ज्योतिषासारख्या गूढविद्येवर विश्वास होता. ज्योतिषक्षेत्रातील अनेक लोकांबरोबर त्यांची ऊठबस असे. पं. नेहरूंच्या अखेरच्या वर्षांतील ज्योतिषाशी संबंधित किस्से त्यांनी मला ऐकविले होते.सिन्हा यांचा ज्योतिषावर कसा विश्वास बसला हे त्यांनी मला सांगितले, एक ज्योतिषी होता. त्याचा उल्लेख उपहासाने ‘पत्रीवाला’ या टोपणनावाने केला जाई. या ज्योतिषाने सरदार पटेलांच्या मृत्यूचे भाकित नऊ महिने आधी सांगितले होते.१९५८ मध्ये टी.टी. कृष्णम्माचारी त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना, ‘ते पतनाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत’ असे भविष्य एका पंडिताने वर्तविले होते. त्यावेळी सत्यनारायण सिन्हा यांनी त्याच्या ज्योतिषाची खिल्ली उडविली होती. मात्र, तो ज्योतिषी आपल्या विधानावर ठाम होता. त्याने आणखी एक गंभीर स्वरूपाची भविष्यवाणी केली. ज्या दिवशी टी.टी. कृष्णम्माचारी सरकारमधून बाहेर पडतील, त्याच दिवशी मौलाना आझाद बाथरूमध्ये पडून चार दिवसांत त्यांचा मृत्यू होईल.






त्यावेळचे शिक्षणमंत्री मौलाना आझाद बाथरूममध्ये पडले, तेव्हा कोलकात्यावरून डॉ. बी. सी. रॉय यांना उपचारांसाठी आणण्यात आले. त्यांनी मौलाना आझाद यांना तपासून, काळजीचे कारण नसल्याचे सांगितले. या प्रसंगानंतर सत्यनारायण सिन्हा व पं. नेहरूंची संसदेच्या परिसरात भेट झाली. त्यांनी मौलाना आझाद यांच्याविषयीचे भविष्य पं नेहरूंना सांगितले. यावर पं. नेहरू सत्यनारायण सिन्हा यांच्यावर रागावले व डॉ. रॉय यांच्या मताचा उल्लेख करून, निरर्थक बडबड न करण्याविषयी सुनावले. यानंतर चारच दिवसांनी शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांचे निधन झाले. यामुळे पं. नेहरू मनातून हादरले होते.पं. नेहरू १९६२ च्या मार्चमध्ये पुण्यावरून, निवडणूक प्रचाराचे काम आटोपून दिल्लीला परतले. यानंतर त्यांना ताप आला. डॉक्टरांचा समज झाला की, निवडणूक प्रचाराच्या दगदगीचा हा परिणाम असावा. मात्र, या तापाचे गंभीर आजारात रूपांतर झाले. पंडितजींचे हे पहिलेच गंभीर आजारपण होते. यामुळे ते महिनाभर अंथरुणाला खिळून होते. काँग्रेसचे नेता म्हणून परत निवडून आले तरीदेखील त्यांना पक्षाच्या बैठकांना हजर राहता आले नाही.“आपली पत्रिका ज्योतिषाला दाखवा,” या सत्यनारायण सिन्हांच्या सल्ल्याकडे पंडितजींनी दुर्लक्ष केले. “तुमचा जवळचा मित्र विश्वासघात करेल व चीनच्या आक्रमणाला याच वर्षी तोंड द्यावे लागेल,” असे भविष्य पंडित नेहरूंना दिल्लीतील एका नामांकित ज्योतिषाने सांगितले होते. हे ऐकून पंडितजी संतापून ओरडले, “हे कधीही होऊ शकत नाही, तुमचे निरर्थक भाषण बंद करा,” यावर तो ज्योतिषी निघून गेला.





चीनच्या आक्रमणानंतर काही आठवड्यांनीच पंडितजींना या ज्योतिषाकडून भविष्य ऐकण्याची इच्छा झाली. मात्र, या वेळचे भविष्य काळजी निर्माण करणारे होते. “पं. नेहरूंच्या आयुष्याचा काळ संपला आहे, केवळ धार्मिक विधींद्वारेच त्यात वाढ करता येईल,” असे ते भविष्य होते. यानंतर अत्यंत गुप्तता राखून ५० ब्राह्मणांना धार्मिक विधी करण्यासाठी दिल्लीच्या ‘कालकाजी’ मंदिरात आणण्यात आले.“पं. नेहरूंना जानेवारी १९६४ मध्ये दुसरे गंभीर आजारपण येईल व ते २७ मे, १९६४ च्या पुढे जगू शकणार नाहीत,” असे भविष्य या ज्योतिषाने वर्तविले. ४ जानेवारी, १९६४ रोजी पं. नेहरू भुवनेश्वर येथील काँग्रेस अधिवेशनासाठी जाणार होते. हे भविष्य सत्यनारायण सिन्हा यांना माहीत असल्यामुळे त्यांनी पं. नेहरूंना प्रवासापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे न ऐकता पंडितजी काँग्रेस अधिवेशनासाठी भुवनेश्वर येथे निघून गेले. त्यानंतर केवळ दोन-तीन दिवसांमध्येच त्यांना गंभीर आजाराने ग्रासले. या आजारातून ते पूर्णपणे कधीच बरे होऊ शकले नाहीत. १४ मे, १९६४ रोजीच्या ‘ऑल इंडिया काँग्रेस कमिटी’ अधिवेशनामध्ये सत्यनारायण सिन्हा यांनी कॅबिनेटमधील सहकार्‍यांना पं. नेहरूंविषयी भविष्याविषयी माहिती देऊन सावध केले होते. २७ मे, १९६४ रोजी पं. नेहरूंचे निधन झाले. यानंतर माझी भेट सरकारमधील एका वरिष्ठ अधिकार्‍याशी झाली. त्याने सत्यनारायण सिन्हा यांच्या कथनास पुष्टी देणारी माहिती सांगितली. तो अधिकारी म्हणाला, “पूर्वी पं. नेहरू यांचा पारंपरिक श्रद्धा व भविष्यावर विश्वास नव्हता, तो हळूहळू निर्माण झाला. पूर्वी ते भारतीय आयुर्वेदिक उपचारपद्धतीला अशास्त्रीय समजत होते. मात्र, आयुष्याच्या शेवटच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांचा ज्योतिषावर विश्वास कसा बसला? कालखंडात एका नामांकित आयुर्वेदिक वैद्याकडून ते उपचार घेत होते.”





पं नेहरू त्यांच्या आत्मचरित्रामधून लिहितात, “भारत हा एक धार्मिक देश आहे. हिंदू, मुस्लीम, शीख हे आपापल्या धर्मावर विश्वास ठेवतात आणि एकमेकांची डोकी फोडूनदेखील त्यांचा धर्म श्रेष्ठ आहे, असे शपथपूर्वक सांगतात. भारतामध्ये किंवा जगामध्ये इतर कोठेही धर्माचे जाहीर प्रदर्शन किंवा संघटितरीत्या धार्मिक चालीरीतींचा अवलंब माझ्या मनात भीती उत्पन्न करतो, मी याची निर्भर्त्सना करून हे बंद व्हावे, अशी इच्छा करतो. संघटित धर्माचे प्रदर्शन, अंधश्रद्धा आणि प्रतिक्रिया, कट्टरता आणि धर्मांधता, अंधश्रद्धा आणि शोषण, छुप्या स्वार्थाच्या जपणुकीसाठी असते. तरीदेखील मला हे माहीत आहे की, धर्मामध्ये काहीतरी असे आहे, जे माणसाच्या मनामधील खोलवर दडलेल्या भावनांची तृप्ती करते. अगणित पीडित आत्म्यांना शांती व समाधान प्रदान करणारीही शक्ती केवढी विराट असली पाहिजे.” पंडितजींची ही विचारमालिका बरेच काही सांगून जाते.हिंदुस्थानच्या फाळणीमुळे होणार्‍या संभाव्य दुष्परिणामांविषयी योगी अरविंद यांना अनेक वर्षे आधीपासूनच सखोल जाणीव झाली होती. त्यांनी जागतिक घटनांबाबत वेळोवेळी हस्तक्षेप करून मार्गदर्शन केले होते. जेव्हा कोरियाचे युद्ध झाले त्यावेळी संयुक्त राष्ट्रसंघाने त्यामध्ये हस्तक्षेप करावा, असा अभिप्राय दिला होता. त्याप्रमाणे कोरियामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने आक्रमणकर्त्यांचा विरोध केल्यामुळे प्रथमच असे दृष्टीस पडले की, जगामधील सुधारलेली प्रजा आक्रमणकर्त्यांच्या अन्यायाविरुद्ध उभी राहत आहे. जगाच्या ज्ञात इतिहासामध्ये युद्ध रोखण्यासाठी असे पाऊल प्रथमच उचलले गेले होते. संयुक्त राष्ट्रसंघाने वेळीच हस्तक्षेप केला नसता तर कोरियाच्या युद्धामधून तिसरे जागतिक महायुद्ध उद्भवण्याची दाट शक्यता होती.





१९५० मध्ये उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर आक्रमण केले, त्यासंदर्भात योगी अरविंद यांनी आपल्या ‘मदर इंडिया’च्या जुलैच्या अंकात लिहिले होते की, “हा साम्यवादी डाव आहे. यानुसार तिबेटवरदेखील आक्रमण होऊ शकेल.” अनेक वर्षांनी या लेखाची टायपिंगमधील नक्कल अमेरिकन राष्ट्राध्यक्ष केनेडी यांच्या पाहण्यात आली. त्यावेळी केनेडी सुधीरदास यांना म्हणाले की, “या टायपिंगमध्ये जरूर काहीतरी गडबड आहे. यामध्ये १९५० च्या ऐवजी १९६० असे पाहिजे होते.” विस्तीर्ण भारताच्या एका कोपर्‍यात बसलेली व्यक्ती साम्यवादी चीनच्या डावपेचांविषयी चिंतन करते व तब्बल १२ वर्षे आधी चिनी आक्रमणाविषयी भविष्य वर्तविते. यावर विश्वास ठेवणे केनेडींना कठीण गेले.सुरेंद्रमोहन घोष यांच्याशी चीन व रशियाच्या साम्यवादाविषयी चर्चा करताना योगी अरविंद म्हणाले होते की, “एके दिवशी रशिया व चीन यांची फाटाफूट होईल” आणि झालेदेखील तसेच, त्यावेळी रशियाच्या तुलनेने चीन अगदीच मागासलेला होता. मात्र, अरविंद चीनचा महासत्ता म्हणून भविष्यात होणारा उदय पाहू शकत होते. त्यांनी प्रतिपादन केले होते की, “भारताला रशियापासून नव्हे, तर चीनपासून भय आहे.” त्यांची ही भविष्यवाणीदेखील खरी ठरली. १९६२ साली चीनने भारतावर एकाएकी आक्रमण केले.ज्यावेळी साम्यवादाचे पतन होईल, असा विचार कोणाच्या स्वप्नातदेखील येऊ शकत नव्हता, त्यावेळी योगी अरविंद यांनी ‘मानव एकतेचा आदर्श’ या आपल्या पुस्तकात साम्यवादाच्या पतनाविषयी भाकित वर्तविले होते. त्यांनी लिहिले आहे की, “केंद्रीय सत्तेच्या नियंत्रणाखाली जशी लष्करी तुकडी वावरत असते, त्याप्रमाणे कठोर शासन मानवी स्वातंत्र्याच्या मुळावर उठेल. यामुळे मानवाचे शिक्षण, आर्थिक जीवन, सामाजिक सवयी, नीतिनियम, ज्ञान, धर्म, मानवीय स्वभाव आणि मानवी प्रवृत्ती यांची सत्तेच्या सोयीनुसार मांडणी करण्यासाठी दडपशाही होईल. या सर्व गोष्टींचे अस्तित्व धोक्यात येईल. या मार्गाने विकास होणे अशक्य होईल. लष्करी अनुशासनाप्रमाणे सामाजिक अनुशासन लादले गेले तर याविरुद्ध विद्रोह होईल.”




समाज आपल्या पारंपरिक समजुतींमधून आणि श्रद्धांमधून सहजासहजी बाहेर येत नाही. तथाकथित बुद्धिवंतांनी ज्योतिषविद्येच्या विरोधात कितीही टाहो फोडला तरी ते समाज बदलू शकत नाहीत. हेच सत्य पुढील काळात दृष्टीस येणार आहे.


- मधू देवळेकर
(लेखक माजी आमदार आहेत.)




@@AUTHORINFO_V1@@