अफगाणिस्तानात नमाज सुरू असतानाच मिशिदीत झाला बाॅम्ब स्फोट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2021
Total Views |
afganisthan_1  





काबुल: अफगाणिस्तानमधील कंदाहारमध्ये नमाज सुरू असताना मशिदीमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात ३२ जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. स्फोटाची माहिती मिळताच पोलीस आणि बचावपथक घटनास्थळी पोहोचले. स्फोटात जखमी झालेल्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



 दक्षिण अफगाणिस्तानच्या कंदाहार येथे शिया मशिदीत झालेल्या बॉम्ब स्फोटात ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात 50 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. मशिदीत शुक्रवारच्या नमाज दरम्यान हा स्फोट झाला. गेल्या आठवड्याभरात अफगाणिस्तानातील शिया मशिदीवर हल्ला होण्याची ही दुसरी मोठी घटना आहे.



तालिबानचे प्रवक्ते बिलाल करीमी यांनी सांगितले की, स्फोटाने कंदाहारमधील एका मशिदीला टार्गेट केले. या आठवड्याच्या सुरुवातीला देशाच्या उत्तर भागात असाच स्फोट झाला. त्यांनी या प्रकरणाचा अधिक तपशील दिला नाही आणि सांगितले की सध्या स्फोटाचा तपास सुरू आहे. या स्फोटामागे कोण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शुक्रवारी दुपारी नमाज सुरू होता. यावेळी मोठ्या संख्येनं लोक मशिदीमध्ये उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@