‘बीएसएफ’च्या अधिकारक्षेत्रात वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2021
Total Views |

bsf_1  H x W: 0



नवी दिल्ली : केंद्र सरकारने सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) अधिकारक्षेत्रात वाढ केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने अधिसूचना काढून आंतरराष्ट्रीय सीमेलगत असलेल्या राज्यांमध्ये ‘बीएसएफ’चे अधिकारक्षेत्र ५० किलोमीटर आतपर्यंत वाढवले आहे. केंद्राच्या या निर्णयाचा प्रभाव आंतरराष्ट्रीय सीमेलगत असलेली पाच राज्ये गुजरात, राजस्थान, पंजाब, पश्चिम बंगाल तसेच आसामवर पडणार आहे. ‘बीएसएफ’चे अधिकार क्षेत्र ५० किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्रापर्यंत वाढवण्यात आल्याने ‘बीएसएफ’ला संशयिताला ताब्यात घेवून साहित्य जप्त करण्याची, तसेच त्याची झाडाझडती घेण्याचा अधिकार मिळणार आहे.


‘बीएसएफ’ला पंजाब आणि पश्चिम बंगाल तसेच आसाममध्ये आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या भारतीय भूभागावर ५० किलोमीटर आतापर्यंत कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. पाकिस्तानची सीमा गुजरातलाही लागलेली आहे. परतु, येथे बीएसएफ चे अधिकार क्षेत्र ८० किलोमीटरवरून ५० किलोमीटरपर्यंत कमी करण्यात आले आहे. राजस्थानमध्ये ‘बीएसएफ’चे अधिकार क्षेत्र ५० किलोमीटरपर्यंतचे कायम ठेवण्यात आले आहे. ‘बीएसएस’चे जवळपास २.६५ लाख जवान पाकिस्तान तसेच बांगलादेशला लागून असलेल्या सीमेवर ६ हजार, ३०० हून अधिक भारतीय मोर्चांवर तैनात आहेत.




पंजाब-पश्चिम बंगालचा विरोध


पंजाब आणि पश्चिम बंगाल सरकारकडून या निर्णयाचा विरोध केला जात आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी तसेच प.बंगालचे मंत्री फरहाद हकीम यांनी या निर्णयाला ’संघराज्याच्या चौकटी’वर घाला घालणारा ठरवले आहे. ‘बीएसएफ’ला अतिरिक्त अधिकार प्रदान करण्याचा निर्णय तर्कहीन तसेच संघराज्याच्या संकल्पनेवर वार करणारा आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी हा निर्णय मागे घेण्याची विनंती चन्नी यांच्याकडून करण्यात आली आहे.




‘बीएसएफ’कडून स्वागत

‘बीएसएफ’ने केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे सीमावर्ती भागात घडणार्‍या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी मदत होईल, असे ‘बीएसएफ’कडून सांगण्यात आले आहे. नवीन सुधारणा पंजाब, पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थान आणि आसाम या सीमावर्ती राज्यांमध्ये कार्यांसाठी एकसमानता आणते, असे ‘बीएसएफ’कडून गुरूवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी स्पष्ट करण्यात आले. केंद्राच्या या निर्णयाचे स्वागत करीत या निर्णयामुळे ’अधिकार क्षेत्राला एकरूपता’ आल्याचे मत ‘बीएसएफ’कडून व्यक्त करण्यात आले आहे.








@@AUTHORINFO_V1@@