शालेय विदयार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी नवरात्रोत्सवाचा अनोखा उपक्रम

15 Oct 2021 20:56:41


patil photo_1  
 
 
डोंबिवली  : धर्मराज फाऊंडेशनतर्फे साजरा केल्या जाणाऱ्या जय अंबिका सार्वजनिक नवरात्रोत्सवात शालेय साहित्याची सजावट केली आहे. लहान मुलांना शाळेची गोडी लागावी यासाठी हा प्रयत्न केला आहे, अशी माहिती भाजपा डोंबिवली ग्रामीण सरचिटणीस रविंद्र पाटील यांनी दिली आहे.

कोरोना काळात दोन वर्ष शाळा बंद आहेत. लहान मुले शाळेपासून दूर असल्याने शालेय गळतीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. या मुलांना पुन्हा शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी नवरात्रोत्सवातील सजावटीसाठी वापरण्यात आलेले साहित्याचे मुलांना वाटप करण्यात येणार आहे. गेल्या दहा वर्षापासून नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. दरवर्षी परिसरातील नागरिकांना गरबा आणि दांडियाचे आयोजन केले जाते. पण यंदा कोरोनाचे सर्व नियम पाळून नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळे गरबा आणि दांडियाचे आयोजन केले नाही. तरूणाईचा हिरमोड झाला आहे. गेल्या दोन वर्षापासून गरब्याचे आयोजन केले नाही. मनोभावी देवाची स्थापना करण्यात येईल असे पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले. त्याप्रमाणे मनोभावे देवाची स्थापना केली आहे. कोरोना महामारी दूर होऊ अशी प्रार्थना दुर्गा मातेच्या चरणी केली आहे. या वेळी महेंद्र पाटील उपस्थित होते. तसेच श्रीजन संमेलनी फाऊंडेशनतर्फे मास्क वापरा आणि कोरोनापासून दूर राहा असा संदेश दिला जात आहे. तसेच भक्तांना प्रसादासोबत मास्कचे वाटप केले जात आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी मास्क वापरणे हा एकमेव पर्याय आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरणे अनिवार्य आहे असाच संदेश त्यांनी आपल्या भक्तांना दिला आहे. कोरोना प्रादरुभाव पाहता भक्तांना संपूर्ण फळ प्रसादामध्ये दिले जात आहे.
 

--------------------------------------------------------------
Powered By Sangraha 9.0