राम गोपाल वर्माच्या नासक्या डोक्यातील सडकी कल्पना

14 Oct 2021 18:06:13

ram gopal _1  H




नवी दिल्ली
: गेली काही वर्ष राम गोपाल वर्मा हा त्याच्या कामापेक्षा जास्त त्याच्या कृतीमुळे सतत चर्चेत असतो. त्याने पुन्हा एकदा असेच एक कृत्य केले असून हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. राम गोपाल वर्माने दक्षिण भारतामध्ये सर्वाधिक पुजल्या जाणाऱ्या देवी मैसम्माच्या मंदिरात देवीला दारूचा प्रसाद चढवला आहे. विशेष म्हणजे याबाबतीत त्याने स्वतः ट्विट करून ही माहिती सोशल मिडियावर शेअर केली आहे. स्वतः च्या पब्लिसिटीसाठी हिंदूंची अवहेलना करू नकोस, असे सल्ले सोशल मिडियावरून त्याला दिले जात आहेत.
 
 
भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वात प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्माने मंदिरातील त्याचा फोटो शेअर करत ट्विट केले की, "मी फक्त वोडका पितो, तरी मी देवी मैसम्माला व्हिस्की प्रसाद म्हणून देतो आहे." असे म्हणत चित्रात तो दारूच्या बाटलीतून कपमध्ये काहीतरी देवीच्या प्रतिमेला दाखवताना दिसत आहे. यावेळी त्याच्यासोबत आणखी काही लोकदेखील उभे आहेत. याचसोबत त्याने हसणारे एमोजी ठेवले असून पुढेही आणखी एक ट्विट केले. ज्यामध्ये तो देवी मैसम्माच्या चेहऱ्यासमोर कप धरून उभा आहे. यावेळी त्याने कॅप्शनमध्ये 'चिअर्स' असे लिहिले आहे.
 
 
 
सोशल मिडियावर राम गोपाल वर्माने केलेल्या या कृत्यावर चीड व्यक्त होत आहे. 'गेले काही वर्ष त्याचा एकही चित्रपट चालत नसल्याने तो असे काहीतरी कृत्य करून चर्चेत राहायला बघतो.' असा आरोप एका युझरने केला आहे. तर एकजण मत व्यक्त करताना म्हणाला की, त्याच्या कारकिर्दीला उतरती कळा लागल्याने मनावर परिणाम झाला आहे. तर दुसऱ्या एका युझरने तर तो हे सगळ लक्ष वेधून घेण्यासाठी करत असल्यचे म्हणत टीका केली आहे.
 
 
देवी मैसम्माची पूजा प्रामुख्याने दक्षिण भारतात केली जाते. या व्यतिरिक्त, महाराष्ट्रातही तिची 'मेसाई' आणि 'मेस्को' या नावाने पूजा केली जाते. तिच्याकडे चेचक सारख्या संसर्गजन्य रोगांपासून दूर ठेवण्यासाठी प्रार्थना केली जाते. हैदराबादच्या 'टाकी बंड'मध्ये स्थित 'कट्टा मैसम्मी' मंदिर हे त्यांचे मुख्य मंदिर आहे. याबद्दल एक आख्यायिका आहे की, अगदी निजामाने १९०८मध्ये या मंदिरासमोर डोके टेकवले होते. यानंतरच पूर नियंत्रणात आला.


 
 
 
Powered By Sangraha 9.0