बांग्लादेशमधील 'असे' एक शक्तीपीठ जिथे नवरात्रीला पंतप्रधान दर्शनाला जातात

    दिनांक  13-Oct-2021 17:33:08
|
devi _1  H x W:ढाका - सध्या बांग्लादेशची राजधानी असलेल्या ढाकामध्ये एक वेगळे दुश्य दिसत आहे. संपूर्ण शहर नवरात्रीच्या प्रकाशात उजळले आहे. दुर्गा उत्सव हा येथील हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे. षष्टी ते दशमी दरम्यान सर्वाधिक उत्साह यावेळी दिसून येतो. लोक वर्षभर या १० दिवसांची वाट पाहतात. तुम्ही या गोष्टीचा अंदाज लावू शकता की, या वर्षी ३२,३१८ दुर्गा पूजा उत्सव बांगलादेशामध्ये साजरे केले जात आहेत. एकट्या राजधानी ढाकामध्ये २३८ पूजा मंडप उभारण्यात आले आहेत.

या उत्सव काळात बांगलादेशातील हिंदू श्रद्धेचे मुख्य केंद्र असलेल्या ढाकेश्वरी शक्तीपीठाच्या ठिकाणी भक्तांच्या जयघोष ऐकू येत आहे. नवरात्रीच्या निमित्ताने या मंदिरात देशातील व्हीव्हीआयपी लोकांची रेलचेल असते. राष्ट्रपती, पंतप्रधान, विरोधी पक्षनेते, संसद सदस्य आणि भारतीय दूतावासाचे अधिकारी येथील हिंदूंच्या आनंदात सहभागी होतात.


मंदिर परिसरात हजारो भाविकांची उपस्थिती....

नवरात्रोत्सवानिमित्त या ढाकेश्वरी शक्तीपीठामध्ये हजारो भाविक गर्दी करतात आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होतात. ढाकेश्वरीच्या नावावरून या शहराचे नाव ढाका पडल्याचे सांगितले जाते. असे मानले जाते की, देवी सतीचा मुकुट या ठिकाणी पडला होता. हे शक्तिपीठ १२ व्या शतकात सेना घराण्याच्या शासकाने बांधले होते.


मंदिराच्या आवारात देवी सुवर्ण रूपाने विराजमान आहे. हे मंदिर बंगाली वास्तुकलेचे एक अद्भुत उदाहरण आहे, ज्यात सरळ रेषेत चार शिवमंदिरे आहेत. शक्तीपीठ ढाकेश्वरीचे सदस्य मनींद्र म्हणतात की, सरकारने कोविड संदर्भात जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन उत्सवादरम्यान केले जात आहे. आरती देखील सामाजिक अंतराचे भान राखून केली जाईल. ती टीव्ही आणि सोशल मीडियावर थेट प्रसारित केले जात आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.