टिम इंडिया दिसणार नव्या जर्सीत

आगामी आयसीसी टी-२० वर्ल्ड कपआधी केला बदल

    दिनांक  13-Oct-2021 18:14:45
|

BCCI_1  H x W:
नवी दिल्ली : भारतीय संघ आयसीसी टी-२० वर्ल्ड कपसाठी तयारी करत आहे. अशामध्ये आता भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण केले गेले आहे. पाच खेळाडूंसह या जर्सीचा फोटो बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यापूर्वीच्या तुलनेत ही जर्सी जरा भडक निळ्या रंगाची आहे. कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, केएल राहूल, रविंद्र जडेजा आणि फास्ट बॉलर जसप्रील बुमराह यांच्या फोटोसह या जर्सीचे अनावरण करण्यात आले आहे.
 
 
 
१७ ऑक्टोबरपासून आयसीसी टी-२० वर्ल्ड कप सुरु होणार आहे. २४ ऑक्टोबर रोजी भारतीय संघ आपला पहिला सामना खेळणार असून पाकिस्तानसोबत भिडत होणार आहे. त्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी दुसरा सामना होणार आहे. पहिले दोन्ही सामने दुबई येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. तिसरा सामना अबुधाबी येथे होणार असून ३ नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध हा सामना होणार आहे. त्यानंतरच्या दोन लढती दुबई आणि शाहजहा येथे होणार आहेत. बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली याने सांगितले की, भारतीय संघाला केवळ भारतातून नव्हे तर जगभरातून चाहत्यांचा पाठिंबा मिळतो. या जर्सीच्या माध्यमातून चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.