धोनी फटकेबाजी, चिमुकल्यांना अश्रू अनावर आणि गिफ्ट

11 Oct 2021 18:24:52

dhoni_1  H x W:
दुबई : रविवारी चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपीटल्स दरम्यान झालेल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईने दमदार विजय मिळवला. यावेळी अंतिम षटकात धोनीच्या तडाखेबाज फलंदाजीमुळे पुन्हा एकदा सर्वोत्तम फिनिशर म्हणून स्वतःला सिद्ध केले. याचसोबत चेन्नईने आयपीएलच्या इतिहासात नऊ वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. कॅप्टन कूल धोनीची फलंदाजी पाहून चाहत्यांनाही आनंदाश्रू अनावर झाले होते.
 
 
 
 
 
चेन्नईला अखेरच्या षटकात विजयासाठी १३ धावांची गरज होती. धोनीने या सामन्यात ६ चेंडूत १८ धावा केल्या. या दरम्यान त्याने ३ चौकार आणि १ षटकार मारले. अखेरच्या षटकात पहिल्याच चेंडूवर मोईन अली बाद झाला आणि प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या एक चिमुकली मुलगी आणि मुलाला रडू कोसले. पण त्यानंतरच्या सलग ३ चेंडूवर धोनीने चौकार मारून संघाला विजय मिळून दिला. त्यानंतर या दोन्ही चिमुकल्यांना आनंदाश्रू आवरले नाहीत. त्यानंतर धोनीने चेंडूवर स्वाक्षरी करून तो चेंडू बाल्कनीत असलेल्या मुलाला दिला. याची सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा सध्या रंगली आहे. या दोन्ही मुलांच्या आयुष्यातील हा क्षण कधीच विसरता येणार नाही.
 
Powered By Sangraha 9.0