नितीन गडकरींच्या सहजतेने भारावले सहप्रवासी !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Oct-2021
Total Views |
gadkari_1  H x

ना लवाजमा, ना व्हिआयपी वागणूक; रांगेत उभे राहूनच विमानात प्रवेश
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : जनतेमध्ये मिळूनमिसळून राहण्याची आवड असणारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग बांधणी मंत्री नितीन गडकरी हे आपल्या साधेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे आपल्या प्रवासादरम्यान अन्य प्रवाशांप्रमाणेच रांगेत उभे राहूनच विमानात दाखल होताना पाहून सोमवारी विमानातील सहप्रवासी चांगलेच भारावले.
 
 
 
 
 
राजकीय नेत्यांच्या विमानप्रवासादरम्यान अनेकदा आपल्या पदाचा दाखला देऊन विमानात प्रथम चढणे, विमानात आपला प्रवेश होईपर्यंत अन्य प्रवाशांना थांबवून ठेवणे असे प्रकार होताना दिसतात. राजकीय नेते म्हटले की भरमसाठ लवाजमा आणि व्हिआयपी वागणूक ही ठरलेलीच असते. त्याचा बऱ्याचदा सर्वसामान्य नागरिकांना त्रासही होतो, मात्र या प्रकारास अपवाद आहेत ते केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग बांधणी मंत्री नितीन गडकरी.
 
 

ng_1  H x W: 0  
 
 
केंद्रीय मंत्री गडकरी हे सोमवारी आपल्या नियोजित ठिकाणी पोहोचण्यासाठी विमानतळावर दाखल झाले. त्यावेळी सहप्रवासी विमानात प्रवेश करण्यासाठी रांगेत उभे होते, त्याचवेळी नितीन गडकरी तेथे आले आणि अगदी सहजपणे अन्य प्रवाशांसोबत रांगेत उभे राहिले. ते पाहून सहप्रवाशांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. कारण, नितीन गडकरींसोबत ना लवाजमा होता, ना त्यांनी व्हिआयपी वागणूक घेतली आणि ना अन्य प्रवाशांना थांबवून आधी स्वत: विमानात प्रवेश केला. त्यामुळे सहप्रवासी गडकरी यांची सहजता पाहून अतिशय भारावल्याचे दिसून आले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@