अब्दुल कादिर खान निधन : चोर बाजारातील चोराचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Oct-2021
Total Views |

pakistan_1  H x

 

कराची :
पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमांचे पितामह म्हणून ज्यांना पाकिस्तानमध्ये सन्मान दिला जातो ते 'अब्दुल कादिर खान' याचा कोरोनामुळे दहा ऑक्टोम्बर रोजी मृत्यू झालेला आहे.त्याचे वय ८५ वर्ष होते. पाकिस्तानमध्ये जरी त्यांना अण्वस्त्र कार्यक्रमाचा पितामह म्हणून गणले जात असले तरी जगभरात अब्दुल खानची प्रतिमा ही चोर आणि सौदागर अशीच आहे.
जीवनाचा(चोरीचा) प्रवास

 

अब्दुल खान यांचा जन्म भारतात भोपाळ येथे झाला, १९५२ मध्ये फाळणीच्या वेळेस परिवारासमवेत तो पाकिस्तानमध्ये स्थलांतरित झाला. तिथे त्याला आयुष्यात 'मुहाजिर' म्हणजे 'बाहेरून आलेला' असे चिडवले जायचे. यावरून त्याला अनेक भेदभावांचा सामना करावा लागला होता.परंतु नंतर त्याच्या शिक्षणातील हुशारीमुळे पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनांच्या नजरेत तो आला, त्यास शिष्यवृत्ती देऊन पहिले पश्चिम जर्मनीला नंतर नेदरलँड येथे पाठविण्यात आले. येथूनच त्याच्या चोरीला सुरुवात झाली. युरेनियमचे संवर्धन आणि प्रक्रिया कशी करावी हे त्यावेळी फक्त आधुनिक देशांनाचा माहित होते.अब्दुल खान याने ती बेकायदशीर रित्या चोरण्यास सुरुवात केली. जेव्हा यासंदर्भात त्या त्या देशातील गुप्तहेर संघटनांना कळले,तेव्हा पुन्हा पळ काढून तो इस्लामबाद येथे येऊन लपला. त्यांनतर त्याला युरोपच्या अणवस्त्रा संदर्भात संशोधन करणाऱ्या एका संस्थेत पाठविण्यात आले.

पाकिस्तानचा अण्वस्त्र कार्यक्रम


१९७४मध्ये जेव्हा भारताने आपली पहिली अण्वस्त्र चाचणी केली,त्याचे नाव 'स्माइलींग बुद्ध' असे ठेवण्यात आले. त्याचवेळेस अब्दुल खान यांनी या चोरीचे मुख्य सूत्रधार तत्कालीन पाकिस्तानचे सर्वेसर्वा 'भुट्टो' यांना पत्र लिहिले.या पत्रात त्यांनी चोरी यशस्वी झाली आहे आणि पाकिस्तानही अण्वस्त्र चाचणी करू शकेल,त्यासाठी मला परत देशात येऊ द्यावे अशी विनंती केली. १९८१ मध्ये पाकिस्तनाही आता अण्वस्त्र बनवू शकते,अशी घोषणा अब्दुल खान यांनी केली . तेव्हा संपूर्ण जंगल धक्का पोहचला.

काळा बाजार

खान यांनी देशासाठी अण्वस्त्र शस्रास्त्रेच चोरले नाहीत तर त्यांनी त्याचा इतर देशांसमवेत बेकायदेशीर व्यवहारही केला. त्यात उत्तर कोरिया,लिबिया आणि इराण या देशचन्ह समावेश होतो. आज उत्तर कोरियावर काहीही कारवाई करता येत नाही. याचे प्रमुख कारण उत्तर कोरियाकडे अण्वस्त्रे असणे आणि त्यांना याचा पुरवठा पाकिस्तानमार्फत होणे हा आहे. पाकिस्तानच्या या बेकायदेशीर कृत्यांमुळे संपूर्ण जगाला धोका आहे. या सौदेबाजीत अनेकवेळा खान यांनी अनेकदा देशांना फसविलेही आहे.

२००३ मध्ये जेव्हा अमेरिकेच्या नजरेस हि चोरी पडली तेव्हा त्यांनी मुशरर्फ यांना खान यांच्यासंदर्भात चेतावणी दिली होती. तेव्हा दबावामुळे खान यांना नजरबंदीत ठेवण्यात आले होते.२००९ साली त्यांना नजरबंदीतून सुटका देण्यात आली होती,परंतु इस्लामाबादच्या बाहेर पडण्यास आणि कोणा इतरांना भेटण्यास परवानगी देण्यात आली नव्हती.
 
 
शेवटचे दिवस


२०१९ पर्यंत कोर्टात मानवी हक्कांवरून माझ्यावरील बंधने काढा अशी केस सुरु होती. कोर्टाने त्यांना लोकांना भेटण्याचे स्वातंत्र्य दिले होते. आता २०२१ च्या १० आॅक्टोम्बररोजी कोरोनामुळे जर्जर झालेल्या खान याचा मृत्यू ८५ वर्षी झालेला आहे.







@@AUTHORINFO_V1@@