मूर्ती पुजेमुळे भारत गरीब! ही वैश्यावृत्ति : ईसाई उपदेशक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2021
Total Views |

ISAI _1  H x W:

 
 
तमिळनाडू : भारत देश मूर्तिपूजेमुळे गरीब राहिला आहे. मूर्तिपूजेमुळे ईश्वर कृपा करत नाही, मूर्तिपूजेला वैश्यावृत्ति मानली जाते, अशी गरळ ईसाई उपदेशक एमजी लाजारूस याने ओकली आहे. ट्विटरवर एक यूजर @@HlKodo याने हा व्हीडिओ शेअर केला आहे. त्यात लाजारुस म्हणतो की, “बायबलनुसार, आराधना आणि वैश्यावृत्तिमुळे प्रभू नाराज होतात.
 
 
यावेळी त्याने इस्त्रायलचे उदाहरण दिले आहे. तो म्हणाला, इस्त्रायलमध्ये मूर्तीपूजेमुळे प्रभूला राग आला आणि त्याने मोसेसला सांगितले की, यामुळे मी क्रोधित आहे, याचा नाश कर." मला इथल्या लोकांना सांगायचे आहे की, हे करणे किती गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या देशवासीयांनी प्रभूला क्रोधित करू नये," असेही तो म्हणाले. तामिळनाडूतील मंदिरांबद्दलच्या विषयांवर त्याने ही सूचना केली.
 
 
 
हिंदू धर्माला उपदेश देऊन स्वतःच्या धर्माचा प्रसार करण्याचा प्रकार तमिळनाडूत यापूर्वीही झाला. "मंदिरात सैतानाची निर्मिती होते," असे वादग्रस्त वक्तव्य त्याने यापूर्वीही केले. धर्मांतरण, धर्मप्रसार करण्यासाठी मूर्ती पूजेवर आक्षेप घेतला जातो. त्यांच्या अनुयायांची माथी फडकवून इतर धर्माविषयी गरळ ओकण्याचा प्रयत्न केला जातो. हे काम जोमाने रेटण्याचा प्रयत्न आईएमएच्या ईसाईप्रमुखाद्वारे केला जात असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.
 
 
 
हास्यास्पद उपदेश!


दक्षिणेकडील ईसाई उपदेशकांचा आरोप इतका हास्यास्पद आहे की, इतर धर्मिंयांची मूर्तीपूजा बंद करण्याची भाषा केली जाते. मात्र, स्वतः केलेली मूर्तीपूजा प्रभूला मान्य आहे, असे पटवून देण्यात येते. संविधानतर्फे धार्मिक प्रचाराचे स्वातंत्र असले तरीही इतर धर्मियांच्या निंदा करण्यास परवानगी नाही, ही बाब प्रचारक विसरून जातात.
 



 
@@AUTHORINFO_V1@@