शहरांना कचरामुक्त करणे हे ‘स्वच्छ भारत मिशन’चे नवे ध्येय – पंतप्रधान

    दिनांक  01-Oct-2021 16:40:03
|
modi_1  H x W:

नद्या सांडपाणीमुक्त करणे हे देशाची जबाबदारीनवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी :
'स्वच्छ भारत मिशन-शहरी 2.0' चे ध्येय शहरांना पूर्णपणे कचरामुक्त करणे तर ‘अमृत मिशन’च्या पुढील टप्प्यामध्ये सांडपाणी आणि मैलाव्यवस्थापन सुधारण्याचे ध्येय आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे स्वच्छ भारत मिशन-शहरी 2.0 आणि शहरांचे पुनरुज्जीवन आणि परिवर्तनासाठी अटल मिशन 2.0 चा प्रारंभ केला. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, 2014 मध्ये देशवासियांनी भारताला उघड्यावरील शौचापासून मुक्त - ओडीएफ करण्याची प्रतिज्ञा घेतली होती आणि त्यांनी 10 कोटींहून अधिक शौचालये बांधणीसह ही प्रतिज्ञा पूर्ण केली. आता 'स्वच्छ भारत मिशन-शहरी 2.0' चे ध्येय शहरांना कचरामुक्त, पूर्णपणे कचरामुक्त करणे हे आहे, असे ते म्हणाले. मिशन अमृतच्या पुढील टप्प्यात देशाचे उद्दिष्ट, 'सांडपाणी आणि मैला व्यवस्थापन सुधारणे, आपल्या शहरांना जल सुरक्षित शहर बनवणे आणि आपल्या नद्यांमध्ये कुठेही सांडपाणी वाहणार नाही' असे असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
 
 
स्वच्छतेची मोहीम पुढील स्तरावर नेण्यासाठी केलेल्या उपाययोजनेची माहिती देत पंतप्रधानांनी नमूद केले की, आज भारत दररोज सुमारे एक लाख टन कचऱ्यावर प्रक्रिया करत आहे. ते म्हणाले की ‘जेव्हा देशाने 2014 मध्ये मोहीम सुरू केली, तेव्हा देशात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या 20 टक्क्यांपेक्षा कमी प्रक्रिया केली जात होती, आज आपण दररोज सुमारे 70 टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करत आहोत. आता आपण ते 100 टक्क्यांपर्यंत न्यायला हवे. पंतप्रधानांनी नगर विकास मंत्रालयासाठी वाढीव तरतुदी संदर्भातही सांगितले. ते म्हणाले की, 2014 च्या आधीच्या 7 वर्षांमध्ये, मंत्रालयाला सुमारे 1.25 लाख कोटी रुपये दिले जात होते, तर 2014 पासून 7 वर्षांमध्ये मंत्रालयासाठी जवळपास 4 लाख कोटी रुपये वितरित करण्यात आल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.