आजपासून 'या' सहा गोष्टींचा होणार दैनंदिन जीवनांवर थेट परिणाम

जाणून घ्या काय आहेत आजपासून होणारे नवे बदल

    दिनांक  01-Oct-2021 15:18:13
|

1 OCT _1  H x W
नवी दिल्ली :
देशभरात १ ऑक्टोबरपासून नवे बदल करण्यात आली आहेत. ऑटो डेबिट पेमेंट सिस्टम लागू करण्यात आले आहे. याशिवाय अलाहाबाद, OBC आणि यूनाइटेड बँकेची जुने पासबुकही चालणार नाही. आजपासून होणाऱ्या नव्या सहा बदलांचा आपल्या दैनंदिन आयुष्यावर काय परिणाम होणार जाणून घ्या...

औद्योगिक गॅस सिलिंडरचे दर ४३.५ रुपयांनी वधारले


सरकारी तेल कंपनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशनने (IOC) १९ किलोच्या औद्योगिक वापरासाठी उपयुक्त असलेल्या गॅस सिलिंडरच्या किंमती ४३.५ रुपये प्रतिसिलिंडरने वाढवली आहे. सिलेंडरच्या कींमती वाढल्याने दिल्लीत १९ किलो औद्योगिक गॅस सिलिंडरची किंमत 1693 रुपयांवरून 1736.5 रुपयांवर वाढ झाली आहे. यामुळे हॉटेल्स, छोटी उपहारगृहांच्या खाद्यपदार्थांच्या किंमतीत वाढ होऊ शकते.

तेल कंपनिन्यांनी सर्वसामान्यांसाठी आवश्यक असणाऱ्या घरगुती गॅस सिलिंडरमध्ये कुठलीही वाढ केलेली नाही. त्यामुळे या सिलिंडरच्या दरात कुठलीही वाढ झालेली नाही. दिल्लीत 14.2 किलो विनाअनुदानित गॅस सिलिंडरची किंमत 884.50 रुपये कायम आहे. सप्टेंबरमध्ये तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत २५ रुपयांनी वाढ केली आहे.


ऑटो डेबिटसाठी नवा नियम


१ ऑक्टोबरपासून नव्या ऑटो डेबिट पेमेंट सिस्टम लागू केला जाणार आहे. मोबाइल अॅप, इंटरनेट बँकिंगमध्ये वीज आणि एलआयसीसह अन्य पेमेंटला ऑटो डेबिटवर टाकले असेल तर पाच दिवसांपूर्वी ग्राहकांना याचा मेसेज जाईल. जर रक्कम पाच हजारांवर असेल तर त्याचा ओटीपी पाठवला जाईल. ग्राहकाच्या परवानगीनंतरच पेमेंट पूर्ण होईल.इलहाबबाद, OBC आणि यूनायटेड बँकेचे जुने धनादेश रद्द
१ ऑक्टोबरपासून अलाहाबाद बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) आणि युनाइटेड बँकेचे जुने धनादेश चालणार नाहीत. OBC आणि युनाइटेड बँकेचे पंजाब नॅशनल बँकेसह विलीनिकरण झाले. इलाहाबाद बँकेचा इंडियन बँकेत विलीनिकरण करण्यात आले. त्यामुळे ग्राहकांना आता नवीन धनादेश घ्यावे लागणार आहेत.

डीमॅट अकाऊंटसाठी KYC आवश्यक

भांडवली बाजार नियंत्रक संस्था सेबीतर्फे आजपासून ट्रेडींग आणि डिमॅटच्या नियमावलीत बदल केले आहेत. दोन्हींसाठी KYC आवश्यक झाले आहे. KYC नसलेली खाती रद्द ठरवण्यात येणार आहेत. शेअर बाजारात अशा खातेधारकांना ट्रेडिंग करता येणार नाही. संपूर्ण KYC झाल्यावरच पुन्हा खाते कार्यान्वित होईल.

हयात प्रमाणपत्र घरबसल्या

केंद्र सरकारतर्फे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (DLC) हयात प्रमाणपत्राची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. 1 ऑक्टूबर 2021 पासून ही योजना लागू होणार आहे. याद्वारे डिजिटल प्रमाणपत्र लागू दिले जाणार आहे. Jeevanpramaan.gov.in/app वर नोंदणी करून हे प्रमाणपत्र तुम्ही मिळवू शकता.

बिलावर FSSAI क्रमांक असणे आवश्यक
फूड सेफ्टी अँण्ड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (FSSAI) खाद्य पदार्थांशी निगडीत दुकानांनी नोंद अत्यावश्यक केली आहे. १ ऑक्टोबरपासून या दुकानांना बिलावर FSSAI ची नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच दुकानापासून ते रेस्ट्रोच्या प्रदर्शनी भागात ज्या खाद्यपदार्थांची विक्री होते त्यांची माहिती द्यावी लागेल.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.