१० नवजात बालकांच्या मृत्यूमुळे महाराष्ट्र हादरला

09 Jan 2021 10:58:35

bhanadara news_1 &nb




शनिवारी मध्यरात्री जवळपास २ वाजेच्या सुमारास लागली आग



मुंबई: भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयामध्ये १० नवजात बालकांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. मध्यरात्री अचानक आग लागल्यामुळे अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये आग लागल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे.


भंडारा जिल्ह्यातील सर्व सामान्य रुग्णालय हे गरिब आणि दुर्गम भागातून येणाऱ्या रुग्णांसाठी मोठा आधार आहे. त्यामुळे या रुग्णालयात सर्व प्रकारच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली. जन्मतःच एखाद्या नवजात बालकला काही त्रास उद्भ्वला, वजन कमी असेल, बाळाची प्रकृती ठीक नसेल तर त्याला या अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये ठेवण्यात येते. संसर्गाचा धोका टाळण्यासाठी हे यूनिट काचेने पूर्णपणे बंद असते. यातील तापमान हे बाळाच्या प्रकृतीनुसार नियंत्रित केले जाते. आणि या ठिकाणी डॉक्टर आणि परिचारिकांव्यतिरिक्त कुणालाही आत जाण्यास परवानगी नसते. तसेच प्रकृती नाजूक असल्यामुळे नवजात बाळांची विशेष काळजी घेतली जात आहे.


सामान्य रुग्णालयाच्या या युनिटमध्ये मध्ये एकूण १७ नवजात बालके दाखल केली होती. शनिवारच्या मध्यरात्री जवळपास २ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून पाहिले, तर त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता. त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. मॉनिटरमध्ये असलेली सात बालके वाचवण्यात आली आहेत तर आउट युनिटमधील १० मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे भंडाऱ्यात खळबळ उडाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करत नवजात बालकांचे शवविच्छेदन करणार नाही, असे सांगितले. व या बालकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात येईल, अशी माहितीसुद्धा यावेळी टोपेंनी दिली.



Powered By Sangraha 9.0