पनवेल महानगरपालिकेत कोविड लसीकरणाचे ड्राय रन आजपासून सुरू झाले आहे.
आज २५ आरोग्य कर्मचार्यांना लस देण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्र क्र-१ येथे सुरू असणाऱ्या लसीकरण केंद्राला विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी भेट दिली. यावेळी महानगरपालिकेच्या व्यवस्थापन आणि लसीकरणाच्या प्रक्रियेबद्दल पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.आनंद गोसावी यांच्याकडून जाणून घेतले.
नागरिकांना लवकरात लवकर कशी लस देता येईल यावर सविस्तर चर्चा केली.