‘देशहिताची गोष्ट बोलले की माझ्यावर टीका’ ; कंगना चौकशीला हजर

08 Jan 2021 15:08:44

kangna ranaut_1 &nbs



मुंबई :
अभिनेत्री कंगना रानौत पुन्हा चर्चेत आली आहे. मुंबईत कंगना आणि तिची बहीण रंगोली या दोघी शुक्रवारी वांद्रे पोलिसांसमोर देशद्रोहाच्या प्रकरणात आपले जबाब नोंदवण्यासाठी हजर झाल्या. कंगना आणि रंगोली यांना वांद्रे पोलीस चौकशीसाठी अनेकदा बोलावले. मात्र, कायदेशीर पळवाटा शोधून त्या तारखा टाळण्यात आल्या होत्या. अभिनेत्री कंगना रनौत विरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहिता कलम २९५-अ आणि १५३-अ या कलमानुसार गुन्हा दाखल आहे. या संदर्भात कंगनाला पोलीस स्टेशनमध्ये येण्यासंदर्भात पहिला समन्स २६ आणि २७ ऑक्टोबरला, दुसरा समन्स ९ आणि १० नोव्हेंबर आणि तिसरा समन्स २३ आणि २४ नोव्हेंबर बजावण्यात आला होता. मात्र, त्यानंतर कंगनाने कोर्टात धाव घेतली होती. त्यावर कोर्टाने कंगनाला तपासात पोलीसांना सहकार्य करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कंगनाला आज वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चाैकशासाठी उपस्थित राहवे लागणार आहे.


मात्र, वांद्रे पोलीस स्टेशनकडे रवाना होण्यापूर्वी कंगनाने तिच्या तिच्या ट्वीटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती म्हणत आहे की, मी देशाच्या हिताच्यासाठी बोलले की माझ्यावर टीका होते. माझ्यावर अत्याचार करून माझे शोषण करण्यात आले. माझे घर तोडण्यात आले ऐवढेच नाहीतर मी ज्यावेळी ट्वीटरवर नव्हते त्यावेळी माझ्यावर केस करण्यात आली. कंगनानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यात तिला टॉर्चर का केलं जातंय, असा सवाल करत भारतीयांकडून उत्तर मागितले. अन्यायाविरोधात आवाज उठवल्यानं आपल्याला टार्गेट केलं जात असल्याचंही ती म्हणाली.


''जेव्हा जेव्हा मी अन्यायाविरोधात आपलं मत मांडते, तेव्हा तेव्हा माझ्याविरोधात तक्रारी दाखल केल्या जातात. माझा मानसिक, भावनिक आणि आता शाररिक छळ का केला जात आहे?, या देशाकडून मला याचे उत्तर हवंय... मी तुमच्यासाठी नेहमी उभी राहिली आणि आता तुम्ही माझ्यासाठी उभं राहण्याची वेळ आली आहे. जय हिंद!'', असं तिनं ट्विट केलं. माझी बहिण रंगोलीने डॉक्टरांवर होत असलेल्या अन्यायावर आवाज उठवला तर तिच्यावरही केस करण्यात आली आणि त्या प्रकरणात माझा काहीच संबंध नसताना मलाही गोवण्यात आले. मला पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावण्यासाठी सांगण्यात आले आहे. मात्र, मला माहिती नाही कोणत्या संदर्भात आणि मी काय केले आहे.माझ्यावर झालेले अत्याचार मी कोणालाही सांगू शकत नाही. महिलांना जिवंत जाळले जाते परंतू त्या संदर्भात कोणीही आवाज उठवत नाही. हा अत्याचार लोकांच्या समोर होत आहे. राष्ट्रवादावर आवाज उठवणाऱ्यांचे आवाज जर अशा प्रकारे बंद होत असतील तर असे अत्याचार होत राहतील.
Powered By Sangraha 9.0