‘उधार‘राजाचे जाहीर आभार! म्हणत फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका

08 Jan 2021 15:55:35
devendra fadanvis_1 


मुख्यमंत्र्यांचा नागपूर दौरा

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकेर यांनी आज नागपूर-भंडारा-चंद्रपूर जिल्ह्यांचा दौरा केला. या दौऱ्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘उधार‘राजाचे जाहीर आभार!, असे म्हणत खोचक टीका केली आहे. विदर्भातील नुकसानग्रस्त शेतकाऱ्यांना दिलेल्या मदतीवरुन यांनी ही टीका केली. 



वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. तसेच गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाची पाहणी देखील. मुख्यमंत्र्यांच्या या एकदिवशीय दौऱ्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. त्यांनी टि्व्ट करत म्हटले की, "मा. मुख्यमंत्री यांचा अधिवेशन वगळता १४ महिन्यातील आज पहिला नागपूर दौरा. या दौऱ्यापूर्वी कालच शेतकऱ्यांच्या अंतिम मदतीचा जीआर जारी करण्यात आला. पूर्व विदर्भातील ६जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रचंड अशी 11 कोटी रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली. ‘उधार‘राजाचे जाहीर आभार! " विदर्भातील शेतकऱ्यांना दिलेल्या तुटपुंज्या मदतीवर फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. आहे.


Powered By Sangraha 9.0