जगन्नाथपुरीचे कलाधाम

08 Jan 2021 20:26:08

news page 8  _1 &nbs




 
नुकतेच हैदराबाद, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, जगन्नाथपुरी अशा ठिकाणच्या कला-महाविद्यालयांना भेट देण्याचा योग आला. मी या योगाला ‘भाग्य-योग्य’ म्हणेन. जवळ-जवळ तीन प्रांतांच्या कला-संस्कृतीचा सुरेख संगम या काळात पाहायला आणि अनुभवायला मिळाला. महाराष्ट्रातील मी, या तिघांच्या कला-समन्वय, कला-आत्मीयता आणि कलाविषयक उपक्रम राबविण्याच्या मानसिक उत्साहाला बघून, भारावून गेलो. हा अनुभव कमी की काय, जगन्नाथपुरीच्या ‘ओडिशा कॉलेज ऑफ ऑर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट्स, पुरी’ या कला-महाविद्यालयाच्या उत्सवी मानसिक सकारात्मकतेने तर ‘कळसच’ गाठलेला पाहायला मिळाला.
 
 
 
 
कलाक्षेत्रात, म्होरकी व्यक्ती कशा स्वभावाची, कशा प्रकृतीची आणि किती अभिरुची संपन्न असते, यावर त्या क्षेत्राचं भवितव्य अवलंबून असतं. या क्षेत्रात मुंबईतील २६ वर्षे आणि मुंबईबाहेरील तीन वर्षे अशी २९ वर्षे, कलाध्यापनाची सेवा तसेच सुमारे दोन-अडीच वर्षे अगदी खासगी कलासंस्थेत कलाध्यापन केेलेले असल्यामुळे, कलाक्षेत्रातील महाराष्ट्रापुरते तरी सर्व स्तर (कलाध्यापनाबाबतीत) अनुभव घेतलेले आहेत. ‘अनुभव’ हा एखादा विचार प्रसारण करण्यासाठीचा सर्वात महत्त्वाचा संदर्भ दाखला असतो. मग मी घेत असलेल्या एकत्रित ३१-३२ वर्षांचा काळ जो ‘कलाध्यापनाचा अनुभव’ या वर्गातील असेल, तो विचार करता, माझ्या या क्षेत्रातील निरीक्षणांना महत्त्व असायलाच हवं, अशी धारणा करायला हरकत नाही.
 
 
 
 
असं अगदीच तटस्थ वाटावं, अशी लेखन-भाषा येण्याचं कारणही तसंच आहे. नुकतेच हैदराबाद, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, जगन्नाथपुरी अशा ठिकाणच्या कला-महाविद्यालयांना भेट देण्याचा योग आला. मी या योगाला ‘भाग्य-योग्य’ म्हणेन. जवळ-जवळ तीन प्रांतांच्या कला-संस्कृतीचा सुरेख संगम या काळात पाहायला आणि अनुभवायला मिळाला. महाराष्ट्रातील मी, या तिघांच्या कला-समन्वय, कला-आत्मीयता आणि कलाविषयक उपक्रम राबविण्याच्या मानसिक उत्साहाला बघून, भारावून गेलो. हा अनुभव कमी की काय, जगन्नाथपुरीच्या ‘ओडिशा कॉलेज ऑफ ऑर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट्स, पुरी’ या कला-महाविद्यालयाच्या उत्सवी मानसिक सकारात्मकतेने तर ‘कळसच’ गाठलेला पाहायला मिळाला.
 
 
 
येथील कला-महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संस्थापक डॉ. दुर्गा माधव कार, यांच्या प्रभावित करणार्‍या भेटीने मी फार भारावून गेलो. डॉ. दुर्गा माधव सांगत होते, “सर, आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी वा तत्सम मदतीची वाट न पाहता आणि अपेक्षाही न ठेवता, आमचं काम थांबू देत नाही.” मला त्यांचं हे वाक्य फार ‘कोंदणा’त ठेवावं असं वाटलं. या लेखातील पुढचा परिच्छेद हा डॉ. दुर्गा माधव यांच्या संभाषणातील मुद्द्यांचाच आहे. चिंतन करायला लावणारे त्यांचे विचार मला, महाराष्ट्रातील कलाक्षेत्रासाठी फार अनुकरणीय वाटले.




Page 1 _1  H x
 
 
 
 
ते सांगत होते, संपूर्ण पुरी जिल्ह्यात ‘ओडिशा’ नावाने धारण केलेले ‘अ‍ॅप्लाईड आर्ट’ आणि इतर कलाशाखा असलेले त्यांचे एकमेव कॉलेज आहे. पूर्णपणे स्वबळावर मात्र, ‘युजीसी’ म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोग आणि ‘एआयसीटीई’ म्हणजे ‘अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद’ यांची मान्यता असलेले कला-अभ्यासक्रम ते राबवितात. ‘आम्ही लहान आहोत’, ‘आम्ही लहान आहोत’ असे सांगत-सांगत ते कसे राष्ट्रीय स्तरावरील उपक्रम राबवितात, इतर कलाकारांना बोलावून राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळा कशा समृद्धपणे राबवितात, हेही नम्रपणे सांगत होते. त्यांच्या या उपक्रमांतूनच संपूर्ण पुरी शहरातील सार्वजनिक ठिकाणे, संरक्षक भिंती (कम्पाऊंड वॉल), शासकीय इमारती यांच्या मोकळ्या जागेवर ‘ओडिशा’ आर्ट कॉलेजने ‘सांस्कृतिक ओडिशा आणि सार्वभौम भारता’चे यथार्थ, पण प्रतिकात्मक दर्शन घडविले आहे. म्हणजे पांथस्तालाही आपल्या सांस्कृतिकतेची जाणीव राहावी, असं कलाकार्य ते करीत असतात. ते म्हणाले, “आम्ही आमच्या कॉलेजलाच युनिव्हर्सिटी मानतो, युनिव्हर्सिटी म्हणजे तरी काय? त्याद्वारे कलाशिक्षणच देणार ना? मग ते तर आताही देतोच आहोत, जर आणखी काही गुप्त हेतू आमचे नाहीत तर आम्ही कशाला इतर फंदात पडावे?”
 
 
 
“कलाशिक्षण देणे, कला विद्यार्थी स्वावलंबी बनविणे आणि कलातंत्र-शैली-माध्यमांचा प्रचार-प्रसार करून प्रोत्साहनात्मक उपक्रम यशस्वीपणे राबविणे, यावरच आम्ही आमचे लक्ष केंद्रित केलेले आहे.” अगदी एकेक वाक्य, माझ्यासाठी थक्क करणारं होतं. “कलाक्षेत्राला पुढे नेण्यासाठी कलाक्षेत्राची, आवड असेल, कलाकार्य करण्यास सवड असेल आणि कुठल्याही प्रकारचे सुप्त वा वैयक्तिक हेतू न ठेवता, कलाकार्य करण्याची आत्मिक इच्छाशक्ती असेल, तर ‘ओडिशा आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट‘सारखे छोटेसे कॉलेजदेखील, एखाद्या विद्यापीठीय दर्जाचे कार्य करू शकते.” डॉ. दुर्गा माधव यांचे कृतिशील विचार फार अनुकरणीय आहेत.
 


Page 1 _3  H x  
 
 
 
 
मी त्यांच्या प्रत्येक वाक्यावर महाराष्ट्रातील कलाक्षेत्रातील सध्याच्या कला परिस्थितीशी तुलना करत होतो. कलियुग सुरू असल्यामुळे दोष वा आरोपीच्या पिंजर्‍यात कुणाला उभं करणार? गांधीजींनी तीन माकडांच्या माध्यमातून जो संदेश दिला, तो आजही तसाच अवलंबवावा लागतो, हे कटूसत्य, गळ्यापर्यंत येऊनही मी, डॉ. दुर्गा माधव आणि समस्त ज्येष्ठ कलाकार मंडळींना सांगू शकत नव्हतो. ‘कलायुग’ येण्यासाठी ‘इच्छाशक्ती’ची आणि कलाकार मंडळींच्या एकत्र येण्याची आवश्यकता आहे, हे मात्र प्रत्येकालाच मनोमन पटेल.
 
 
 
या ‘ओडिशा आर्ट स्कूल’ने अनेक विद्यार्थी स्वावलंबी केले आहेत. ‘क्राफ्ट’ हा विषय तर त्यांनी फारच प्रभावीपणे राबविला आहे. पुरीचे पटनायक म्हणजे ‘सॅण्ड स्कल्पटर’ अर्थात ‘वाळुशिल्पे’ साकारणारे कलाकार जगप्रसिद्ध आहेत, हे सर्वश्रुत आहे. समुद्री वातावरणापासून तर ओडिशा लोककलांपर्यंत सर्वच वातावरणाला, या स्कूलने ‘क्राफ्ट’मध्ये आणले आहे. वृत्तपत्राच्या-कागदाच्या लगद्यापासून ‘मास्क’ बनविण्यापासून तर लाकडी, भंगार, अडगळीला पडलेल्या वस्तूंपासून एखादे नवनिर्माण करणे, म्हणजे त्यांच्या विद्यार्थ्यांच्या नजरेला सवयच झाली आहे. पेंटिंग्ज, जाहिरातींची संकल्पने आदी कला विषयांचे त्यांनी, परिस्थितीनुसार परंतु प्रभावीपणे उपयोजन केले आहे.
 
 
 
कुठल्याही कला उपक्रमांस यशस्वी करण्यासाठी त्यांनी वैयक्तिक स्तरावर कला विद्यार्थ्यांच्या कौशल्यक्षमतांचा आणि कल्पना प्रतिभेच्या कक्षांचा चपखळपणे विनियोग केलेला असल्यामुळे अल्पावधीत ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले. ‘ललित कला अकादमी, नवी दिल्ली’ आणि त्यांचे कॉलेज मिळून त्यांना ओडिशा आणि राष्ट्रीय पातळीवर विविध उपक्रम, जगन्नाथपुरीत राबवायचे आहेत, असे स्वप्न त्यांनी बोलून दाखविले.
 
 
 
डॉ. दुर्गा माधव हे बीएफए., एमव्हीए आणि पीएच.डी. असून ‘डाऊन टू अर्थ’ आहेत. फार गरजेचे असते स्वभावात हे असणे...!! आपल्या कलागुणांना नेतृत्वाच्या कोंदणात बद्ध करून, डॉ. दुर्गा माधव यांनी आयोजित केलेल्या विविध आंतरराष्ट्रीय स्तरांवरील सेमिनार्सद्वारे अनेक प्रयोगशील कलाकारांना एकत्र आणण्याची किमया बर्‍याचदा केली आहे. Watana Kreetong, Phansa Buddharaksa, Miss Noomruedee Khamya मुक्तिपाडा नंदी, शंतनुकुमार, हेमंतकुमार राऊल, अशा प्रयोगशील कलाकारांसह अनेकांना त्यांनी पुरीत कलासाधना करण्यास व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
 
 
 
प्रवास हैदराबाद येथील कलासाधकांबरोबर सुरू झाला आणि जगन्नाथपुरीला पोहोचला. तेथे या सार्‍यांच्या आपापसातील समन्वयाने भारावून गेलो. तुलना करायची नसते तरी भावना तर व्यक्त केली पाहिजे. असे कलावातावरण महाराष्ट्राला लाभले आणि पुन्हा पूर्वीचे कलाजीवन पाहायला-अनुभवायला मिळाले तर...!! आता फक्त आशा आणि स्वप्न पाहायचीच वेळ नाही ना येणार (?) अशा प्रश्नभयाने हा लेख थांबवितो...!!


 
 

- प्रा. गजानन शेपाळ
Powered By Sangraha 9.0