कल्याण-डोंबिवली कोविड लसीकरणाचा ड्रायरन यशस्वी

08 Jan 2021 19:04:17
कल्याण-डोंबिवली कोविड लसीकरणाचा ड्रायरन यशस्वी
 
 
 
lasikaran_1  H
 
 
डोंबिवली : गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनाने सर्व जगाला वेठीस धरले आहे. जगातील शास्त्रज्ञांनी ही अवघ्या दहा महिन्यात कोरोनावर लस शोधून काढली. कोविड लसीकरणासाठी देशपातळीवर यंत्रणा सज्ज झाली आहे. गेल्या काही दिवसापासून लसीकरणासाठी शासकीय यंत्रणांनी कंबर कसली आहे. देशात कोविड विरोधातील दोन लसींना केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर लसीकरणाची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रत ही दोन ठिकाणी लसीकरणाचा ड्राय रन घेण्यात आला.
 
डोंबिवलीमधील पाटकर आरोग्य केंद्रामध्ये तर कल्याण पूव्रेतील कोळसेवाडी नागरी आरोग्य केंद्रात हे ड्रायरन घेण्यात आले. लसीकरणादरम्यान येणा:या अडचणी आधीच समजाव्यात या उद्देशाने हा ड्राय रन घेण्यात आला होता. लसीकरणाच्या तयारीत काही त्रुटी राहिल्यास ऐनवेळी शासकीय यंत्रणोचा गोंधळ होऊ नये यासाठी हा ट्रायल घेण्यात आला होता.
 
 
या ड्राय रन मध्ये 20 प्रतिनिधीक स्तरावर हा तयारीचा प्रयोग करण्यात आला. या वीस लाभार्थीना निश्चित करून त्यांना ड्राय रनसाठी मेसेज पाठविण्यात आला होता. या लसीकरणाची रंगीत तालीम घेतल्याने कर्मचा:यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे, अशी माहिती आतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी यावेळी दिली.
 
 
कोविड लसीकरणाच्या वेळेस निवडणूक पॅटर्नप्रमाणो शिस्तबध्द प्रक्रिया राबविण्यात येणार असून लसीकरणासाठी प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष यांची रचना करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सरकारी व खाजगी आरोग्य अधिकारी, कर्मचारी, दुस:या टप्प्यात पोलिस, सुरक्षा कर्मचारी, सरकारी कर्मचारी तिस:या टप्प्यात वयोवृध्द आणि व्याधीग्रस्त आणि इतर लाभाथ्र्याचे लसीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर टप्प्याटप्प्याने रोज शंभर लाभाथ्र्याचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
 
 
कल्याणमधील ड्राय रन महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील तसेच कोळसेवाडी नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली काशीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. डोंबिवलीतील ड्राय रन उपआयुक्त सुधाकर जगताप, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, डॉ. समीर सरवणकर आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहासिनी बडेकर यांच्या देखरेखीखाली घेण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. किशोर चव्हाण यांनी डोंबिवलीतील पाटकर नागरी आरोग्य केंद्राला भेट देऊन ड्राय रनचा आढावा घेतला. त्यांनी महापालिकेने लसीकरणासाठी केलेल्या तयारीबद्दल समाधान व्यक्त केले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0