अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे मराठी साहित्य संमेलन नाशकात

    दिनांक  08-Jan-2021 14:43:44
|

sahitya sammelan_1 &


 
साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांची घोषणा 
नाशिक: अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी औरंगाबादेत याची घोषणा केली. मार्च महिन्यात हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. या संदर्भात नाशिक मध्ये बैठक घेऊन तारीख जाहीर करण्यात येणार आहे.sahitya sammelan_1 &
९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे उस्मानाबादला पार पडले होते. रानकवी ना. धों. महानोर यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले होते. आणि ९३ व्या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे होते.यापूर्वी नाशिकला १९४२ साली २७ वे साहित्य संमेलन झाले होते. त्यावेळी संमेलनाचे अध्यक्ष प्र.के.अत्रे होते. तर २००५ साली ७८ वे संमेलन झाले होते आणि केशव तान्हाजी मेश्राम हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.