नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या १,६२७ जागा बिनविरोध!

    दिनांक  08-Jan-2021
|
voting_1  H x W

नाशिकमध्ये प्रत्यक्ष निवडणूक ४,२६८ जागांवर
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी पार पडलेल्या माघारीच्या प्रक्रियेंतर्गत तब्बल पाच हजार ४६३ उमेदवारांनी माघार घेतली आहे. ५,८९५ जागांपैकी तब्बल १,६२७ जागा बिनविरोध झाल्या आहेत. सर्वाधिक २३८ जागा सिन्नरमध्ये बिनविरोध झाल्या असून, आता ४,२६८ जागांवर प्रत्यक्षात निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


ग्रामपंचायत निवडणुकीचा जिल्ह्यात धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. आता भावबंदकीतच राजकारण सुरू झाले आहे. ऐनथंडीत गावगाड्यातील राजकारण तापल्याने निवडणुकीतही रंगत आली आहे. दुसर्‍या बाजूने कोरोनाचे संकट असल्याने अधिकाधिक ग्रामपंचायतींमधील जागा बिनविरोध करण्याकडेच स्थानिकांचा कल होता. त्याची फलनिष्पत्ती म्हणून १,६२७ जागांवर प्रत्येकी एकाच उमेदवाराचे अर्ज प्राप्त झाले.


दरम्यान, ६२१ ग्रामपंचायतींच्या ५,८९५ जागांसाठी १६,५६८ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. छाननीमध्ये ४४३ अर्ज बाद झाले, तर पाच हजार ४६३ जणांनी माघार घेतली. त्यामुळे ११, अर्ज शिल्लक राहिले. यातून १,६२७ जागा बिनविरोध झाल्या असून, सध्याच्या स्थितीत ४,२६८जागांवर प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे.