'व्हॉट्सअप'चा 'हा' बदल स्वीकारला नाही तर अकाऊंट होणार बंद!

    दिनांक  07-Jan-2021
|
news _1  H x W:
 
 वॉशिंग्टन : तुम्ही जर दैनंदिन गरजांसाठी जास्तीतजास्त 'व्हॉट्सअप'चा वापर करत असाल तर आता ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. नव्या वर्षानिमित्त युझर्सना नव्या अटीशर्थींना मान्यता द्यावी लागणार आहे. ८ फेब्रुवारीपर्यंत तसे न केल्यास तुमचे अकाऊंट बंद करावे लागणार आहे. कंपनीच्या अटी व शर्थी मानण्यासाठी सर्व युझर्सना ८ फेब्रुवारी हीच अंतिम मुदत देण्यात आली आहे.
 
 
 
आतापर्यंत व्हॉट्सअप ही सेवा पूर्णपणे दिली जात होती. तसेच व्हॉटसअपवर कुठल्याही जाहिराती दाखवल्या जात नव्हत्या. त्यामुळे कंपनीचे उत्पन्नाचे साधन काय आहे याबद्दल अत्यंत गोपनीयता बाळगली जात होती. जगभरात व्हॉट्सअॅपचे एकूण दोनशे कोटी युझर्स आहेत. या सर्वांतर्फे नव्या अटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. या नव्या पॉलीसी आणि अटी काय आहेत याबद्दल जाणून घेऊयात सविस्तर...
 
 
काय आहे व्हॉट्सअॅपची नवी पॉलीसी ?
 
व्हॉट्सअॅपवर नव्याने अटी शर्थी व गोपनियता अटी लागू केल्या आहेत. त्यात स्पष्टपणे म्हटले आहे की २०२१, ८ फेब्रुवारीपासून ही लागू केली जाणार आहे. त्यानंतर युझर्सला ही पॉलीसी स्वीकारावी लागणार आहे. तसे न केल्यास तुमचे अकाऊंट तुम्हाला वापरता येणार नाही. त्यासाठी हेल्प सेंटर या पर्यायावर क्लिक करावे लागेल. तिथे गेल्यावर पॉलीसीमध्ये सहमत (Agree) किंवा आता नाही असे दोन पर्याय दिसतील. त्यात म्हटले आहे की आम्ही सेवा ऑपरेट करण्यासाठी व्हॉट्सअपवर येणारा जो कंटेट आहे. जे मेसेज, फोटो, ऑडिओ, व्हीडिओ युझर पाठवत असतो किंवा मिळवत असतो त्याचा वापर कंपनी आता कुठेही करू शकते. तसेच त्याच आशयाचा पूर्नवापर, वितरण आणि दाखवला जाऊ शकतो.
 
असा निर्णय का घेण्यात आला ?
 
या पॉलीसी अंतर्गत संमती दिल्यानंतर व्हॉट्सअप आपल्या दोनशे कोटी युझर्सचा डाटा वापरू शकते. तसेच हा डेटा एका प्लॅटफॉर्मवरून दुसरीकडे पाठवू शकते. नव्या पॉलीसीमध्ये स्पष्ट म्हटले आहे की व्हॉट्सअपने नव्या पॉलीसी आणि नोटीफिकेशनद्वारे स्पष्ट केले आहे की, व्हॉट्सअप आता त्यांची पॅरेंट कंपनी इन्स्टाग्राम आणि फेसबूकसोबत डेटा शेअर करून व्यावसाय करू शकतात.
 
 
३. पॉलीसीचा युझरवर काय परिणाम होणार ?
 
जर युझरला व्हॉट्सअप सुरू ठेवायचे आहे तर सर्व अटीशर्थींना मंजूरी द्यावी लागणार आहे. म्हणजे जरी संमती नसली तरीही युझर्सकडे दुसरा पर्याय उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे युझर्सची प्रायव्हसी कंपनीसोबत शेअर करावी लागणार आहे. व्हॉट्सअप आता युझर्स संपूर्ण डेटावर नजर ठेवण्यात येणार आहे.
 
 
 
४. अशी ठरणार रणनिती

व्हॉट्सअप आता तुमच्या बँकेचे नाव, त्यातील रक्कम, ऑनलाईन वस्तू मागवल्यावर डिलिव्हरीचे स्थान सगळे ट्रॅक करेल. तुमच्या पैशांच्या व्यवहारांवरही नजर ठेवली जाईल. त्याद्वारे कंपनी युझरचे प्रोफाईलिंग करेल की आपण सर्वसामान्य व्यक्ती आहात की उच्च भ्रू व्यक्ती. तुम्ही कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जाता तुम्ही कुठल्या नव्या वस्तू विकत घेता याची चर्चा केलेले तुमचे संभाषण कंपनीकडे असणार आहे.
 
 
५. लोकेशन आणि आयपी अॅड्रेस होणार ट्रेस 

 व्हॉट्सअपने पर्याय दिला आहे की लोकेशनची सेटींग डिसेबल केली जाऊ शकते. त्यात हे देखील स्पष्ट केले आहे की, मोबाईलद्वारे आपले आपल्या आयपी अॅड्रेसद्वारे तुम्ही कुठे आहात याची माहिती मिळवली जाईल.
 
 
६. स्टेटसही सुरक्षित नाहीत 

 व्हॉट्सअप आता आपले स्टेटसही पाहू शकतो. जर तुम्ही स्टेटमध्ये 'आस्क मी' या ट्रेंड प्रमाणे विचारले की मी कुठली गाडी खरेदी करू ? त्यात फेसबूक इन्स्टाग्रामवर याची माहिती पाठवली जाईल. त्यानुसार तुम्हाला केवळ गाडीच्या जाहिराती दाखवल्या जातील. तुम्ही जर कुठे फिरण्यासाठी जात असाल तर हॉटेल्स, टूर कंपनी आणि पॅकेज आदी जाहिराती दाखवल्या जातील.
७. आशयाचे निरिक्षण केले जाईल 

 व्हॉट्सअप आपल्या मित्रांना ग्रुप कंटेट आदी माहिती सुचवू शकतो. त्यामुळे आता प्रत्येक हालचालीवर व्हॉट्सअप नजर ठेवून असणार आहे. त्याचे निरिक्षण केले जाईल. त्यातून मार्केटींग रणनितीसाठी हा डेटा वापरला जाईल.

८. कॉलवरही असणार नजर

युझर कुणाशी किती वेळ व्हॉट्सअपवर बोलतो. कुठल्या ग्रुपवर जास्तीत जास्त सक्रीय असतो. ब्रॉडकास्टच्या किती याद्या आहेत. व्हीडिओ, फोटो फॉरवर्ड केल्यानंतर आता सर्व्हरवर सेव्ह राहणार आहेत. त्यामुळे कुठला व्हीडिओ जास्तीत जास्त फॉरवर्ड होत आहे याची माहिती कंपनीला मिळणार आहे. याचा फायदा फेक न्यूज ट्रॅक करण्यासाठी होणार आहे. या सर्व अटींमधून बिझनेस अकाऊंट सुद्धा यातून सुटणार नाहीत.


९. आता काय कराल ?

नव्या पॉलीसीचा युझरवर महत्वाचा परिणाम होणार आहे. युझरच्या प्रायव्हवर मोठा परिणाम होणार आहे. कंपनीच्या अटी शर्थींवर संमती दर्शवल्यानंतर या सर्व माहिती पुरवण्यासाठी संमती दिली जाते. व्हॉट्सअॅप सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला आता कंपनीच्या अटी मानन्याशिवाय पर्याय राहत नाही. कारण ८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत या शर्थी मान्य केल्या नाहीत तर अकाउंट डिलीट करावे लागणार आहे.

१०. कंपनीच्या एण्ड टू एण्ड एन्क्रिप्टेड पॉलिसीचे काय ?


 एण्ड टू एण्ड एन्क्रिप्टेड पॉलिसीमध्ये कंपनी हा दावा करते की मेसेज, डेटा हा कंपनीकडे राहत नाही. ८ फेब्रुवारी रोजी ही कंपनी आता पॉलीसी बंद करणार आहे. ही पॉलीसी तयार करताना कंपनीने म्हटले होते की, तुमची प्रायव्हसी आमच्यासाठी महत्वाची आहे. त्यासाठी आम्ही हे फिचर तयार केले आहे. या अंतर्गत युझर्सचा सर्व डेटा मेसेज, डॉक्युमेंट, सुरक्षित राहतात. त्याचा कॉन्टेंट सुरक्षित राहील. मात्र, नव्या पॉलीसीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.