मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी

07 Jan 2021 12:27:06

kishori pednekar_1 &
 

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल




मुंबई:
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या प्रकरणी बुधवार दि. ६ जानेवारी रोजी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.


महापौर किशोरी पेडणेकर यांना २२ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता एक निनावी फोन आला. अज्ञात व्यक्तीने महापौरांना फोनवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. फोनवर बोलणारा इसम हिंदी भाषेत बोलत होता.


या धमकीच्या फोननंतर महापौरांनी महापालिका मुख्यालयाला लागून असलेल्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, धमकी देणार्‍या व्यक्तीला पोलिसांनी ट्रेस केले आहे. धमकी देणारी व्यक्ती जामनगरमधील असून लवकरच त्याला अटक केली जाण्याची शक्यता आहे.

Powered By Sangraha 9.0