इस्त्रोच्या वैज्ञानिकाच्या हत्येसाठी घरात सोडले जात आहेत साप !

06 Jan 2021 14:28:29
isro_1  H x W:
 
 


दोन वर्षांपासून सुरू आहे विषप्रयोग

बंगळुरू : इस्त्रोच्या वरिष्ठ सल्लागार आणि वैज्ञानिक डॉ. तपन मिश्रांनी आपल्याला तीनवेळा विषप्रयोग करून मारण्याचा प्रयत्न गेल्या तीन वर्षात झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. डॉ. मिश्रा ३१ जानेवारी रोजी निवृत्त होणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी ५ जानेवारी रोजी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये हे आरोप केले आहेत. इस्त्रोचे वैज्ञानिक पुढे जावेत, अशी बाहेरच्या लोकांची इच्छा नाही. तसेच कमी खर्चात अत्याधूनिक प्रणाली तयार करते ही सलही अनेकांना बोचते.
 
 
 
डॉ. मिश्रांनी या अंतर्गत तंत्राच्या मदतीने आंतरराष्ट्रीय हेरगिरीचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी डॉ. विक्रम साराभाई यांच्या रहस्यमयरित्या झालेल्या मृत्यूचा हवाला देत केंद्र सरकारकडे या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. प्रसिद्धी माध्यमाशी चर्चा करताना त्यांनी या प्रकरणातील बरेच धक्कादायक गोष्टी उघड केल्या आहेत.
 
 
 
विषामुळे दोन वर्ष रक्तस्त्राव होत होता
 
डॉ. मिश्रा यांच्या मते, "बरेच दिवस मी ही बाब लपवून ठेवली होती. मात्र, ही माहिती आता देण्याची वेळ आली आहे. पहिल्यांदा २३ मे २०१७ रोजी बंगळुरु मुख्यालयात बढतीच्या मुलाखतीदरम्यान, अर्सेनिक ट्राईऑक्साईड देण्यात आला होता. दुपारच्या जेवणात चटणीत हे मिसळण्यात आले होते. कारण जेवणानंतर भरपेठ असल्यावर हे रसायन माझ्या शरिरात राहील. शरीरात पसरून यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. मला दुपारच्या जेवणानंतर प्रकृती बरी नसल्याची जाणवली. त्यामुळे चटणीसोबत मी डोसा खाल्ला होता. त्यामुळे पोटात रसायन जास्त दिवस टीकले नव्हते. त्यामुळे दोन वर्षात मला रक्तस्त्रावाचा त्रास जाणवू लागला.
 


isro_2  H x W:


(पायाची चामडी निघणे सुरू झाले होते.)
 
 
 
२०१९ आणि २०२० मध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न
 
वरिष्ठ वैज्ञानिकांच्या मते, दुसरा हल्ला चांद्रयान २च्या प्रक्षेपणादरम्यान दोन दिवसांपूर्वी झाला होता. १२ जुलै २०१९ रोजी हाइड्रोजन साइनाइडद्वारे मला मारण्याचा प्रयत्न झाला. NSG ऑफिसरच्या सर्तकतेमुळे माझा जीव वाचला होता. माझ्या हायसिक्युरीटीच्या घरात सुरुंग बनवून विषारी साप सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिसऱ्यांदा सप्टेंबर २०२० मध्ये आर्सेनिक देऊन पुन्हा मारण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर मला श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला होता. फुफ्फुसांचा त्रास, शरिराची त्वचा निखळणे, न्यूरोलॉजिकल आणि फंगल इंफेक्शन आदी समस्या जाणवू लागली. एम्स दिल्लीतील डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले, "आर्सेसिनेशन ग्रेड मॉलिक्युलर 'एएस २०३'पासून वाचण्याचे असे हे पहिलेच प्रकरण आहे. जून २०१७ मध्ये त्यांचा एक संचालक सहकारी व गृहमंत्रालय अधिकाऱ्यांवर विषप्रयोग होणार असल्याची माहिती देत सर्तक करण्यात आले होते."
 
 
हल्ल्याचा प्रयत्न का झाला ?
 
डॉ. मिश्रा म्हणतात, "असे हल्ला सैन्य आणि वैज्ञानिकांना निशाणा बनवण्यासाठी किंवा मार्गातून हटवण्यासाठी केला जातो. मी याबद्दल वरिष्ठांना कळवले होते. माजी अध्यक्ष किरण कुमार यांनी हे ऐकून घेतले. मात्र, डॉ. कस्तूरीरंगन आणि माधवन नायर यांनी ऐकून घेतले नाही. तरीही माझा हत्येचा प्रयत्न होतच राहिला. अहमदाबाद स्थित इस्त्रोच्या स्पेस एप्लिकेशन (सेक) मध्ये ३ मे रोजी २०१८ ला मोठा धमाका झाला होता. त्यातून मी वाचलो होते. एक भारतीय-अमेरिकन प्रोफेसर माझ्या कार्यालयात आले. माझ्या मुलाला एका अमेरिकन इन्स्टीट्युटमध्ये दाखल करून देण्याची ऑफर दिली. मी त्याला नकार दिला तर मला संचालक पद गमवावे लागले.
 
 
सुरक्षा असूनही घरात साप निघत आहेत.
 
डॉ. मिश्रा म्हणतात, "दोन वर्षापूर्वी घरात कोबरा, करेट आदी विषारी साप आढळत आहेत. त्यापासून निपटारा करण्यासाठी १० फूटांवर कार्बोलिक अॅसीड सुरक्षा दिल्यानंतरही घरात साप आढळत आहेत. मी मरावा, असा प्रयत्न अनेकांचा आहे. मआझ्या घरात 'एल' आकाराच्या सुरंग सापडला आहे. त्यातून साप सोडले जात आहेत. मी मेलो तर या प्रकरणातील सर्व धागेदोरे माझ्या सोबतच गाडले जातील. देशाने माझ्या कुटूंबाला वाचवावे, अशी आर्जव त्यांनी केली आहे.





isro_1  H x W:





Powered By Sangraha 9.0