अल्पवयात सिगारेटचं व्यसन करणाऱ्यांचा आकडा पाहता वयाची मर्यादा वाढणार?

06 Jan 2021 19:03:03

cigarete_1  H x



वयाची मर्यादा १८ पेक्षा वाढवण्यासाठी आरोग्य मंत्रालयाचा सरकारकडे प्रस्ताव



मुंबई: अल्पवयात सिगारेटचं व्यसन करणाऱ्यांचा आकडा पाहता वयाची मर्यादा कायद्यानुसार सिगारेट पिण्याचे वय आता अठरा वरून एकवीस वर्ष करण्याचा प्रस्ताव आरोग्य मंत्रालयाने सरकारकडे दिला आहे. त्याप्रमाणे सुट्टी सिगारेट विक्रीवरही बंदी घालण्यात येणार आहे. दरम्यान या निर्णयाच स्वागत जरी करण्यात येत असलं, तरी याची अंमलबजावणी कशाप्रकारे होणार हा प्रश्नच आहे.
 

सिगारेटच व्यसन करण्यात अल्पवयीन मुलांचाही मोठा समावेश असल्याच दिसून येताच आरोग्य विभागाने एक प्रस्ताव सरकारकडे सादर केलाय. कायद्यानुसार सिगारेट पिण्यासाठी १८ वर्षाची वयोमर्यादा आता २१ वर्ष करण्यात येणार आहे. तसेच तंबाखुजन्य असे कुठलेही पदार्थ २१ वर्षाखालील कोणालाच आणि कुठल्याही मार्गे पोहोचणार नाही व सुट्टी सिगारेट विक्रीवरही बंदी घालण्याची शिफारस केली गेली आहे. एवढंच नाही तर सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास होणारी कारवाई अधिक कठोर केली जाणार आहे.


विशेष म्हणजे हॉटेल्स किंवा एअरपोर्ट्सवरील धूम्रपान कक्षही बंद करण्यात यावे असं आरोग्य मंत्रालयाच्या प्रस्तावात म्हटलेलं आहे. त्यामुळे आता या निर्णयाची देखील अंमलबजावी कशी होते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. एकंदरीतच आरोग्य मंत्रालयाने उचललेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. हा प्रस्ताव मान्य होईल अशी दाट शक्यता जरी असली तरी मात्र तो फक्त कागदावरच न राहता त्याची अंमलबजावली होणेसुद्धा तेवढेच आवश्यक आहे.


Powered By Sangraha 9.0