'हलाल' शब्द हद्दपार करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

05 Jan 2021 12:58:56
Halal _1  H x W
 


वाचा सविस्तर हलाल व झटका मांस म्हणजे काय ?

नवी दिल्ली :  केंद्र सरकारतर्फे सरकारच्या कृषि आणि प्रसंस्कृत खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणातर्फे (एपीडा) मांस मॅन्युअलमधून हलाल शब्द हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एपीडातर्फे हलाल शब्द हटवून नवी मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे.
 
 
हिंदू राईट विंग समुह आणि शीख संघटनांनी हलाल सर्टिफिकेशन विरोधात ऑनलाईन अभियान सुरू केले होते.वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत येणारी 'एपीडा' निर्यात होणाऱ्या कृषी उत्पादनांची निगराणी करते. इस्लामिक देशांच्या गरजेनुसार मांस निर्यातीसाठी हलाल प्रक्रियेअंतर्गत जनावरांना मारण्यात आले आहे की नाही याची माहिती दिली जात होती. मात्र, आता हा शब्द नियमावलीतून वगळण्यात आला आहे.
 
 
एपीडातर्फे जाहीर करण्यात आले आहे की भारत सरकारतर्फे हलाल मांस अंतर्गत कुठलीही नियमावली ठेवलेली नाही. यात सांगण्यात आले की आयात करणाऱ्या देशांच्या गरजेनुसार आता हा निर्णय घेतला जाऊ शकतो.
 
 
हलाल मांस म्हणजे काय असते ?
 
 
हलालसाठी प्राण्याच्या मानेवर एका मोठ्या व धारदार सुऱ्याने गळा चिरला जातो. त्यानंतर श्वासनलिका कापली जाते. काही काळाने प्राण्याचा मृत्यू होतो. इस्लाम मान्यतेनुसार, हलाल होणाऱ्या प्राण्यापुढे दुसरा प्राणी नेला जाऊ नये. एका प्राण्याला हलाल केल्यानंतर दुसरा आत नेला पाहिजे.
 
 
झटका मांस म्हणजे काय ?
 
वीजेचा झटक्याच्या नावावरून झटका मांस हा शब्द प्रचलित झाला आहे. या प्रकारात प्राण्याला इलेक्ट्रीक शॉक देऊन त्याचा मेंदू सुन्न केला जातो. त्यामुळे तो मरण्यासाठी जास्त संघर्ष करत नाही. प्राण्याच्या डोक्यावर जोरदार हत्याराने प्रहार केला जातो आणि त्याचे शरीर वेगळे केले जातो.
Powered By Sangraha 9.0