'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा'

05 Jan 2021 12:18:36

shivsena_1  H x



मुंबई :
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अधिक प्रतिष्ठेची मानली जात आहे. मुंबई महानगरपालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र भाजपच्या तगड्या आव्हानासमोर शिवसेनेने मुंबई महापालिकेत सत्ता कायम राखण्यासाठी गुजराती मतदारांना जागृत करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे.


shivsena_1  H x
फेब्रुवारी महिन्यात राज्यातील १० महानगरपालिकांच्या निवडणूक होण्याची शक्यता आहे. शिवसेना गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या मेळाव्यासाठी शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांना सेनेकडे वळवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गुजराती बांधवांना आकर्षित करण्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी टॅगलाईन वापरली जात आहे. या मेळाव्यासाठी गुजराती आणि मराठी भाषेत निमंत्रणे छापण्यात आली आहेत. येत्या १० तारखेला जोगेश्वरीत हा मेळावा होणार आहे. समोर आलेल्या पत्रकानुसार १०० गुजराथी बांधव शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. विधानसभा निवडणुकांच्यावेळीही वरळी विधानसभा मतदारसंघात अशाचप्रकारे 'केम छो वरळी'चे पोंस्टर आदित्य ठाकरेंच्या प्रचारादरम्यान पाहायला मिळाले होते.
Powered By Sangraha 9.0