मुंबई : ‘दै. मुंबई तरुण भारत’च्या बहुचर्चित ‘कोविड योद्धा १२५’ या विशेषांकाचे प्रकाशन राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी, दि. ४ जानेवारी रोजी ‘दै. मुंबई तरुण भारत’च्या कार्यालयात करण्यात आले. यावेळी भारतीय विचार दर्शनचे अध्यक्ष सुश्रुत चितळे, ‘दै. मुंबई तरुण भारत’चे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर, ‘दै. मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार आणि ‘दै. मुंबई तरुण भारत’चे व्यवसाय प्रमुख रविराज बावडेकर उपस्थित होते. प्रकाशनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व ‘कोविड योद्ध्यां’चे तसेच हा अंक साकारनाऱ्या ‘दै. मुंबई तरुण भारत’च्या टीमचेही कौतुक केले.