'लोगो' का काम है केहेना !

31 Jan 2021 17:52:28

1 22 _3  H x W:
 
 

'मिंत्रा'चा (Myntra) Logo बदलला - योग्य कि अयोग्य ?


मुंबई : मिंत्रा (Myntra) या कंपनीने 'अवेस्ता फाऊंडेशन'च्या तक्रारीनंतर काही तासांतच आपल्या लोगोमध्ये (Logo) बदल केला. मिंत्रा (Myntra) या कंपनीच्या लोगोमुळे महिलांच्या भावना दुखा़वत असून त्यांचा अवमान होत असल्याची तक्रार त्यांनी मुंबई पोलीस उपायुक्त सायबर सेल यांच्याकडे केली होती. त्यानुसार, कंपनीने माघार घेतली. तक्रारदार नाज पटेल यांनी अवेस्टा फाऊंडेशन (Avesta Foundation NGO) यांच्यातर्फे डिसेंबर २०२० रोजी ही तक्रार दाखल केली होती. ही मागणी केवळ विनंती नव्हतीच तर कडक कारवाई करावी, तसेच सोशल मीडियावर याविरोधात तीव्र मोहिम उघडण्यात आली होती.
 
 
 
 
1 22 _2  H x W:
 
 
 
 
कंपनीचाच झाला फायदा !
 
लोगोमध्ये झालेल्या बदलामुळे हा विषय सोशल मीडियावरील गरमागरम चर्चेत आला. अनेकांनी त्यावर मिम्स, पोस्टर बनवून भरभरून शेअर केले. तर संबंधित फेमिनिस्ट कार्यकर्त्यांनाही फटकारले. आजवर कधीही चर्चेत न आलेल्या या विषयाची चर्चा झाल्यानंतर अनेकांनी कथित आक्षेपार्ह लोगोही शेअर करत या मार्मिक अंगाने या विषयांवर बोट ठेवले होते. मिंत्रा (Myntra) या कंपनीचा लोगो नग्न महिलेच्या प्रतिमेप्रमाणे दिसत असल्याचा आरोप तक्रारीत लावण्यात आला आहे.
 
 
 
 
 
 
कंपनीनेही अगदी विनम्रपणे आपल्या 'ब्रॅण्ड'व्हॅलूला धक्का पोहोचणार नाही, अशी काळजी घेत बदल केलाही. कंपनीच्या याच कामगिरीबद्दल अनेक मंडळी कंपनीच्या पाठीशी उभी ठाकली. याबद्दल लिहीणारे एक फेसबूक युझर म्हणतात, "मी इतके वर्षे मिंत्रा (Myntra) या कंपनीचा ग्राहक आहे मात्र, आजवर कधीही लोगो पाहून असा विचार आला नव्हता." अचानक या बदलाने कंपनीला मोफतची प्रसिद्धी मिळू लागली आहे. विशेष म्हणजे ही तक्रार करणाऱ्या कार्यकर्त्या किंवा संस्थेपेक्षा ब्रॅण्ड जास्त ट्रेंडमध्ये आला.
 
 
 

1 22 _1  H x W: 
 
 
इतर लोगोंवरही बोट
 
या वादानंतर आता अनेक कंपन्यांच्या लोगोचीही चर्चा होऊ लागली आहे. या इतर कंपन्यांनाही हाच कायदा लागू करणार का ?, कुठल्याही कंपनीच्या लोगोवर कुणी आक्षेप घेतला म्हणून बदल करणे शक्य आहे का? इतक्या वर्षांच्या ब्रॅण्डव्हॅल्यूजचे काय ? हा देखील प्रश्न उपस्थित राहतो. लोगोमुळे चर्चेत आलेला हा वाद आता नैतिकता या मुद्द्यांवर येऊन ठेपला आहे. विशेषतः अनेक ट्रेंण्ड सेटर्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आदी कंपन्यांनी याबद्दल प्रश्न विचारणे सुरू केले आहे.
 
 
 
 
इतर सगळे मुद्दे संपले का ?
 
ज्या देशात मासिक पाळी विषयक रूढ चालीरिती, महिला अत्याचार, बलात्कार, शोषण, हुंडा बळी आदी समस्या भेडसावत असताना या मुद्द्यांवर बोलण्याऐवजी एखाद्या कंपनीच्या लोगोमुळे महिलांचा अवमान होतो, असे म्हणणे कितपत योग्य आहे, असाही प्रश्न काही युझर्सनी सोशल मीडियाद्वारे विचारला आहे.
Powered By Sangraha 9.0