मुंबईकरांनो! वडापाव 'इतक्या' रुपयांनी महागला

31 Jan 2021 16:52:54
Vadapav _1  H x
 
 


वडापाव, भजीपावच्या दरांमध्ये वाढ

मुंबई : मुंबईकरांचा 'इंडियन बर्गर' मानला जाणारा चटपटीत वडापाव महागण्याची शक्यता आहे. चणाडाळीचे पीठ (बेसन), बटाटा आणि अन्य पदार्थांच्या किंमती वाढल्याने १२ रुपयांना मिळणारा वडापाव आता १५ रुपयांना मिळणार आहे. वडापावसह मिळणाऱ्या समोसा, कटलेट आणि भजी प्लेट आदींचेही भाव वाढण्याची शक्यता आहे. भजी प्लेटची किंमत चार ते पाच रुपयांना वाढणार आहे.
 
 
बीकानेर, ठक्कर स्वीट्स आदी दुकांनांमध्ये वडापाव आता २० रुपयांना मिळणार आहे. जम्बो किंगमध्ये मिळणारा वडापाव १८ रुपयांना विकला जात आहे. पूर्वी ही किंमत १५ रुपये इतकी होती. अन्य बड्या हॉटेल्समध्येही या किमती वाढवण्यात येणार असल्याने मुंबईकर आणि खवय्यांना याचा फटका बसणार आहे.
 
 
चणाडाळीचे वाढते भाव, लॉकडाऊनचे संकट इतर दैनंदिन खर्च पाहता भाववाढ करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे मत खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी सांगितले आङे. त्यामुळे आता वडापाव हा १२ रुपयांवरून १५ रुपयांवर गेला आहे. जम्बो किंगमध्ये पूर्वी वडापाव १५ रुपयांना तर भजीपाव १८ रुपयांना विकला जात आहे. मात्र, कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने आता व्यावसाय करणे परवडले नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
 
 
 
महागाईचा फटका
 
दररोज लागणाऱ्या तेलाच्या किमतीतही वाढ झाली आहे. बेसनाचे दर १५-२० टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे खाद्यपदार्थांची दरवाढ अटळ होती. या महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. त्यामुळे सरकारने या किमतींवर अंकुश लावण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी केली जात आहे.

Powered By Sangraha 9.0