कडोंमपातील नाटयगृहांवर झळकली हाऊसफुल्लची पाटी

03 Jan 2021 19:36:28

Kalyan_1  H x W
डोंबिवली : कोरोनाने सगळ्या जगाला वेठीस धरले आहे. त्यांचा परिणाम नाटयगृह आणि नाटय कलाकारांवर ही झाला. जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने नाटयगृहे उघडली खरी, पण तेथील नाटयकृतीला रसिकांनी दि. ३ जानेवारी रोजी भरभरून दाद दिली. नाटयरसिकांच्या उदंड प्रतिसादामुळे सावित्रीबाई फुले आणि आचार्य अत्रे नाटयगृहात रविवारी हाऊसफुल्लचा बोर्ड झळकला आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. नाटय कलावंत, नाटयनिर्माते, नाटयगृह व्यवस्थापक हाऊसफुल्लच्या बोर्डने सुखावले.
 
 
कोरोनाच्या प्रादूर्भावानंतर कडोंमपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि शहर अभियंता सपना कोळी यांच्या सहकार्याने एमएमआरडी व्हिजन मध्ये सर्वप्रथम नाटयगृह खुले करण्याचा मान कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिराने पटकावला आहे. सावित्रीबाई फुले जयंती दिनी कल्याण-डोंबिवलीतील प्रेक्षकांनी आचार्य अत्रे आणि सावित्रीबाई फुले या दोन्ही नाटयगृहात नाटकांना उपस्थिती लावली. यामुळे दोन्ही नाटयगृह कोविडच्या नियमांचे पालन करून हाऊसफुल्ल झाली होती. दोन प्रेक्षकांमध्ये सामाजिक अंतर, मास्कचा वापर आणि सॅनिटायझरचा वापर यावेळी प्रेक्षकांनी केला. कोविड-१९ च्या काळात मानसिक दडपणावर मात करून शासनाचे नियम पाळून आपल्या दैनंदिन जीवनात रसिक पुन्हा एकदा नव्याने सुरूवात करीत आहे. हे पाहून आनंद वाटत असल्याचे अभिनेते भरत जाधव यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0