फौजी येणार २६ जानेवारीला ! अक्षय कुमारने केले ट्विट

03 Jan 2021 16:54:04

FAU G_1  H x W:
मुंबई : चीनी पब-जी विरुद्ध भारतीयांसाठी 'फौ-जी' हा मोबाईल गेम आता भारतात लाँच होणार आहे. अक्षय कुमारने फौजीचे गाणे ट्विटवर प्रदर्शित केले. यावेळी या व्हिडियो गेमचे लाँच होणार असल्याचे घोषित केले. अक्षय कुमार आणि त्याची संपूर्ण टीम गेल्या काही महिन्यांपासून यावर काम करत होते. त्यामुळे चीनी पब-जी या मोबाईल व्हिडियो गेमला भारतीय 'फौ-जी' टक्कर देणार आहे.
 
 
 
 
 
 
 
अक्षयने प्रदर्शित केलेल्या हे गाणे देशभक्ती आणि उत्कटतेने भरलेले आहे. यावेळी त्याने “फौजी अॅन्थम. समस्या देशातील असो की सीमेवरची. हे भारताचे नायक नेहमीचं उभे राहतात. ते निर्भिड आणि एकत्रित सुरक्षा कर्मचारी आहेत. आमचे सैनिक! हे गाण पहा. आताच नोंदणी करा." असे म्हंटले आहे. अक्षय कुमारने शेअर केलेले फौजी गाणे इंटरनेटवर चांगलेच गाजत आहे. तसेच सोशल मीडियावरदेखील हे गाणे प्रचंड व्हायरल झाले आहे. आतापर्यंत ४ लाखाहून अधिक लोकांनी हे गाणे पाहिले आहे.
 
Powered By Sangraha 9.0