बाजार गडगडला : गुंतवणूकदारांवर अर्थसंकल्पाचे दडपण

27 Jan 2021 17:47:25

BSE _1  H x W:
 


नवी दिल्ली : अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सलग चौथ्या दिवशी भांडवली बाजार घसरणीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बुधवारी ९३७.६६ अंशांनी घसरणीसह बंद झाला. इंडसइंड बँक आणि टायटनचा शेअर सर्वात जास्त ४-४ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. संपूर्ण शेअर बाजारात घसरणीत बँकींग आणि मेटल शेअर पुढे आहेत. यापूर्वी शेअर बाजारात सप्टेंबरमध्ये चार दिवस सलग घसरण नोंदवण्यात आली होती.
 
 
जगभरातील शेअर बाजाराचा कारभार सुस्त सुरू आहे. दुपारनंतर सुरू झालेल्या युरोपियन भांडवली बाजारही सपाट झाले. केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी सादर केले जाणार आहे. याचा तणाव शेअर बाजारावर आहे. गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या बजेटमधून काय निघेल याची साशंकता असल्याने भांडवली बाजारावर याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.
 
 
 
२.६ लाख कोटींचा चुराडा
 
काही दिवसांपूर्वी शेअर बाजारात तेजीचे वातावरण होते. केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी गुंतवणूकदार पूर्वीपेक्षा जास्तीचा नफा मिळवून विक्री करण्यावर भर देत आहेत. रिलायन्स, TCS, HDFC बँक, बजाज फायनान्स आदी शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली. भांडवली बाजारात ६० टक्के शेअरची घसरण नोंदवण्यात आली आहे. मुंबई शेअर बाजारातील ३ हजार ६३ शेअरमध्ये कारभार सुरू होता. त्यापैकी १ हजार ७३ शेअर वधारले. १ हजार ८४० शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे. शेअर बाजारात नोंदणीकृत कंपन्यांच्या भांडवलात २.६ लाख कोटी रुपयांनी घसरून १८९.५० लाख कोटी रुपये इतका राहीला आहे.
 
 
 
निफ्टी १४ हजारांखाली
 
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) २७१.४० अंकांनी निचे १३ हजार ९६७.५० वर पोहोचला. १७ सत्रांनंतर पहिल्यांदाच १४ हजारांच्या खाली घसरला आहे. टाटा मोटार्स, टाटा स्टील, टायटन आणि इंडसइंड बँक आदी शेअरमध्ये प्रत्येकी ४ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. हिंडाल्कोमध्ये ३.९७ टक्क्यांनी घसरण नोंदवण्यात आली. तर टेक महिंद्रा, विप्रो, एसबीआय लाईफ आदी शेअरमध्ये २ टक्क्यांची घसरण नोंदवली होती.



Powered By Sangraha 9.0