"ज्यांची तु आयुष्यभर काळजी घेतलीस, त्यांनी तुझा आणि माझा विश्वासघात केला"

27 Jan 2021 17:54:58

gautam karajagi_1 &n



शीतल आमटेंच्या मृत्युनंतर पती गौतम करजगी यांची भावनिक पोस्ट

मुंबई: ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे आणि साधना आमटे यांची नात शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याने अनेकांना धक्का बसला. सामाजिक क्षेत्रात याबाबत फार उलट सुलट चर्चाही झाल्या. शीतल आमटेंनी जगाचा निरोप घेतल्यानंतर त्यांच्या सासू-सासऱ्यांनी आपल्या भावना माध्यमांसमोर व्यक्त केल्या होत्या.


नुकतंच दिवंगत शीतल आमटे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पती गौतम करजगी यांनी एक भावनिक पोस्ट केली आहे. शीतल आमटे यांना चमकत्या ताऱ्याची उपमा देत गौतम करजगींनी ४० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 'तुला अशाप्रकारे शुभेच्छा द्याव्या लागतील असं मला कधीही वाटलं नव्हतं. माझा अजूनही विश्वास बसत नाही की, तु आता माझ्यासोबत नाहीस' असं म्हणत गौतम करजगी यांनी शीतल आमटे यांच्या जाण्याने करजगी कुटुंबात निर्माण झालेली पोकळीही व्यक्त केली.


त्याचप्रमाणे या पत्राद्वारे गौतम यांनी त्यांचा मुलगा शर्विल यालाही शीतल यांच्या अपेक्षेप्रमाणे वाढवण्याचे वचनही दिले आहे. तसेच "ज्यांची तु आयुष्यभर काळजी घेतलीस, त्यांनी तुझा आणि माझा विश्वासघात केला. तु अशा कुटुंबात पुनर्जन्म घेशील जिथे आपल्या मुलीची काळजी आहे" असेही यावेळी गौतम करजगी यांनी म्हटले आहे.


Powered By Sangraha 9.0