“जयंत पाटील हे अनावधानानं राजकारणात आलेलं पात्र आहे.”

23 Jan 2021 17:32:13


jayant patil _1 &nbs 
 

 पडळकरांचा जयंत पाटील यांना टोला  

 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतेच एका मुलाखतीत मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे असं विधान केलं होतं.यानंतर मोठी चर्चा झाली. यावर आज नेहमी चर्चेत असणारे भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी पडळकर यांनी जयंत पाटील हे अनावधानाने राजकारणात आलेल्या पात्र आहे असा म्हणत निशाणा साधला आहे.
 
 
 
 गोपीचंद पडळकर हे म्हणाले की, जयंत पाटील हे अनावधानाने राजकारणात आलेल्या पात्र आहे. राजाराम बापूंच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर त्यांना राजकारणात संधी मिळालीय. अनुकंपा तत्वावर भरती करताना गुणवत्ता तपासली जात नाही. पाटील यांची गुणवत्ता नसताना लोकांनी त्यांना भरभरून दिलंय. पण ते स्वत:च्या जिल्ह्यातही काही करू शकले नाहीत. त्यामुळे 'राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळेल अशी परिस्थिती निर्माण होईल असं वाटत नाही. मुळात हा पक्षच भविष्यात राहील की नाही याची मला शंका आहे,' असा टोला पडळकर यांनी हाणला आहे.
 
 

'जयंत पाटील हे फार बुद्धिमान आहेत असा त्यांचा व त्यांच्या पक्षाचा समज आहे. मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना 'युनो'मध्ये पाठवण्याचा विचार करायला हव.'मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न बघायला हरकत नाही. मात्र, १९९० पासून जयंत पाटील राजकारणात करताहेत. एवढ्या वर्षात केलेलं एक मोठं काम किंवा प्रकल्प ते सांगू शकत नाहीत. जिल्ह्यासाठी येईल ते सगळं मतदारसंघात न्यायचं एवढंच ते काम करतात. मग राज्याची अवस्था काय होईल याचा विचार करा,' असंही पडळकर यांनी म्हटले आहे.

Powered By Sangraha 9.0