'या' ६ खेळाडूंना मिळणार एसयूवी ; आनंद महिंद्रांची घोषणा

23 Jan 2021 17:34:41

aanand mahindra_1 &n



ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूंचा करणार एसयूवी देऊन सन्मान

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच्या देशात धूळ चारत इतिहास रचला. विशेष म्हणजे, या संपूर्ण मालिकेमध्ये भारताच्या 'यंग ब्रिगेड'ने महत्त्वाची कामगिरी केली. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेल्या या कामगिरीचे सर्व देशभर कौतुक झाले. आता भारताचे प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी चांगली कामगिरी केलेल्या तरुण खेळाडूंना महिंद्रा थार एसयूवी देण्याची घोषणा केली आहे.


भारतीय संघाच्या या ऐतिहासिक कामगिरीवर खूश होऊन बीसीसीसआयने पाच कोटींचे बक्षीसही जाहीर केले. "अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारताच्या युवा ब्रिगेडने ऑस्ट्रेलियाचे गर्वहरण केले. भारतीय संघातील युवा खेळाडूच्या कामगिरीवर उद्योगपती आनंद महिंद्रा खूस झाले आहे. त्यांनी संघातील या युवा सहा खेळाडूंना महिंद्रा थार एसयूवी भेट देण्याची घोषणा केली आहे." आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत ही माहिती दिली.


दुसऱ्या सामन्यात पदार्पण करणाऱ्या शुबमन गिल यांन आपल्या फलंदाजीने सर्वांनाच प्रभावीत केले. या मालिकेत शुबमन याने दोन अर्धशतके झळकावली. टी नटराजन याने आपल्या खेळीने सर्वांनाच प्रभावीत केले. नटराजन याने एकाच दौऱ्यात टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी संघात पदार्पण केले. नवदीप सैनीची या सामन्यात कामगिरी सर्वसामान्य झाली होती. मात्र, कर्णधार अजिंक्य रहाणेच्या एका शब्दावर दुखापत झाल्यानंतरही गोलंदाजी केली.


शिवाय, फलंदाजीसाठीही मैदानात उतरला होती. शार्दुल ठाकूरने निर्णायक कसोटी सामन्यात कठीण प्रसंगावेळी ६७ धावांची खेळी केली. तसेच सामन्यात सात बळीही घेतले. शमी दुखापतग्रस्त झाल्यानंतर मोहम्मद सिराजला मेलबर्न कसोटी सामन्यात संधी मिळाली होती. सिरजानं तीन कसोटी सामन्यात १३ बळी घेत आपली निवड सार्थ ठरवली. सिराज भारताकडून या मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. रविंद्र जडेजा दुखापतग्रस्त झाल्यानंतर वॉशिंगटन सुंदरला अखेरच्या कसोटी सामन्यात संधी मिळाली. सुंदरनं अखेरच्या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजीत दमदार कामगिरी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सुंदरने पदार्पणाच्या कसोटीसामन्यात ६२ आणि २२ धावांची खेळी केली. शिवाय ४ बळीही घेतले.


Powered By Sangraha 9.0