खानावळ : छेना तडातडी

22 Jan 2021 22:45:14

999  _1  H x W:
 
 
‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे विविध कौटुंबिक कार्यक्रम, सोहळे संपन्न होत आहेत.या कार्यक्रमांमध्ये ‘डिझर्ट’ ठरवताना त्याच त्याच पदार्थांना ‘छेना तडातडी’ हा बंगाली पदार्थ उत्तम पर्याय ठरू शकतो. करण्यास आणि खाण्यास सोप्पा असा हा बंगाली गोड पदार्थ ‘छेना तडातडी.’
 
 
साहित्य
१ लीटर दूध, पाव चमचा सायट्रिक अ‍ॅसिड अथवा १ चमचा लिंबाचा रस, अर्धी वाटी खवा, १ वाटी साखर, पाव वाटी बदाम, पिस्त्याचे काप, पाव वाटी काजूची पूड, आवडीनुसार केसर कृती, १ लीटर दूध उकळवून थोडे आटवून घ्यावे. आटवलेल्या दुधामध्ये पाव चमचा सायट्रिक अ‍ॅसिड किंवा १ चमचा लिंबाचा रस घालावा. ते व्यवस्थित एकजीव करून दूध नासवून घ्यावे.
कृती
नासवलेले दूध बारीक जाळीच्या चाळणीतून गाळून घ्यावे. गाळल्यानंतर राहिलेला दुधाचा चोथा फ्रायपॅनवरती पाच-सात मिनिटे व्यवस्थित परतवून घ्यावे. त्यानंतर त्यात साखर घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत परतावे. मिश्रण घट्ट झाल्यावर जरा थंड करून त्यात मिल्क पावडर किंवा खवा मिसळावा. दुसर्‍या एका भांड्यात साखरेचा पक्का पाक करून घ्यावा. तोपर्यंत दुधाचे मिश्रण थंड करून त्याचे गोळे करावेत. ते काळजीपूर्वक साखरेच्या पाकात बुडवावेत व पाक सुकण्याआधी ते बदाम-पिस्त्याचे काप आणि काजूच्या पूडमध्ये घोळवून घ्यावेत.
आवडीनुसार वरती केसर ठेवून सर्व्ह करावेत तुमच्याही पाककृती शेअर करा! सणांमध्ये शरीरासाठी पौष्टिक अशा पाककृतीही केल्या जातात किंवा सणांचा उद्देशही धार्मिक कारणांसह ऋतूनुकूल आहार उपलब्ध व्हावा, असाही असतो. तेव्हा, तुमच्या काही खास पाककृती, साहित्य-कृती आणि पाककृतीच्या सुस्पष्ट फोटोसह आम्हाला जरुर पाठवा. त्यासोबत तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटोही आम्हाला mtbedit@gmail.com वर ईमेल करा. ईमेलमध्ये ‘खानावळ’साठी असा उल्लेख असावा. तुमच्या अशा आगळ्या-वेगळ्या पाककृतींना आम्ही नक्कीच प्रसिद्ध देऊ.
Powered By Sangraha 9.0