मुंबईकरांच्या नाकाखालूनच होतोय दहशतवादाला आर्थिक पुरवठा !

    दिनांक  22-Jan-2021 18:59:44
|
NCB _1  H x W:
एनसीबीच्या कारवाईत धक्कादायक माहिती उघड

 
 
मुंबई : मुंबईत होणाऱ्या ड्रग्ज तस्करी प्रकरणातून आता नवे धक्कादायक खुलासे येऊ लागले आहेत. मुंबईतूनच दहशतवादाला आर्थिक रसद पुरवली जात असल्याची माहिती आता उघड होऊ लागली आहे. दाऊदचे हस्तक ड्रग्स विकून करतायेत दहशतवादाला आर्थिक पुरवठा केला जात होता. ड्रग्जमधून आलेला पैसा दाऊदला पाठवला जात असल्याची माहीती उघड झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची लिंक थेट दाऊदशी जोडण्यात येत आहे.
 

NCB _3  H x W:  
 
 
 
पाच वर्षात तब्बल १५०० कोटींचे ड्रग्ज विकले जात असल्याचा खुलासा अधिकाऱ्यांनी केला आहे. हवालामार्गे हे पैसे पाठवले जात होते. समीर वानखेडे यांनी शुक्रवारी ही कारवाई केली. डोंगरीमध्ये टाकलेल्या चार धाडसत्रामध्ये अनेक ड्रग्ज अड्डे उध्वस्त करण्यात आले आहेत. गोल्ड स्मगलिंगची चैन तोंडल्यानंतर दाऊदने ड्रग्जचा धंदा सुरू केल्याचे बोलले जात आहे. या कारवाईत दाऊदच्या आणखी एका हस्तक अटकेत आहे. येत्या काही दिवसात मुंबईतून दाऊदची ड्रग्सची दहशत संपवणार तसेच ड्रग्स तस्करीतून करुन दाऊदच्या हस्तकांनी कमावलेली संपत्ती जप्त करणार असल्याचा इशारा एनसीबीने दिला आहे.
 
 


NCB _2  H x W:
 
धडाकेबाज कारवायांसाठी ओळखले जाणारे समीर वानखेडे यांनी दाऊदच्या डोंगरीत घुसून त्याच्या हस्तकांच्या मुसक्या आवळल्या आहेत. 'डी' कंपनीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. दाऊदच्या डोंगरीत घुसून त्यांनी कारवाई केली. यात त्यांनी दाऊदच्या हस्तकांच्या मुसक्याही आवळल्या आहेत. वानखेडेंनी डोंगरीतील ड्रग्ज फॅक्ट्री उधळून लावली आहे. याचे थेट कनेक्शन दाऊदशी असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर वानखेडेंची सुरक्षा वाढवली आहे.
 
 
 

NCB _1  H x W:  
 
 
 
या कारवाईत करीमलाच्या नातूलाही अटक झाली आहे. प्रतिदाऊद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरीफच्या घरात घुसून ही कारवाई करण्यात आली. वानखेडेंनी दाऊदच्या साम्राज्याला धक्का लावल्याने त्यांच्या या बहादुरीचे देशभरातून कौतूक केले जात आहे. यातच दोन महिन्यांपूर्वी समीर वानखेडेंसह NCB च्या पथकावर हल्ला करण्यात आला होता.
 
 
 
 
 
 
२३ नोव्हेंबर २०२० रोजी मुंबईतील गोरेगाव परिसरात एका ड्रग्ज पेडलर्सला पकडण्यासाठी गेलेल्या NCBच्या पथकावर जमावातर्फे हल्ला करण्यात आला होता. यात अधिकारी समीर वानखेडेंसह त्यांच्या टीमचे पाच जणांना लक्ष्य करण्यात आले. दोन अधिकारी या हल्ल्यात जखमी झाले होते.
 
 
 
 
 
एनसीबीचे पथक कॅरी मेंडिस नावाच्या ड्रग्ज पेडलर्सकडे छापेमारीसाठी गेले. त्यावेळी अचानक ५० ते ६० जणांच्या जमावाने तिथे गर्दी करत एनसीबीच्या पथकावर हल्ला केला. कोणतीही पूर्वकल्पना नसल्याने डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांची संपूर्ण टीमला या हल्ल्याचा जबरदस्त धक्का बसला. या हल्ल्यात एनसीबीचे विश्वविजय सिंह आणि शिवा रेड्डी असे दोन अधिकारी जखमी झाले होते.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.