नवी दिल्ली : सुप्रसिद्ध भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचे दिल्लीतील अपोलो रुग्णालयात निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. वयोमानानुसार शरीर थकत असल्याने इतर व्याधींमुळे त्यांच्यावर गेल्या दोन महिन्यांपासून उपचार सुरू होते. त्यांनी दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. 'चलो बुलावा आया है' आणि 'ओ जंगल के राजा मेरी मैया को लेके आजा' आदी त्यांची गाजलेली गाणी.
चंचल यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९४० रोजी अमृतसरच्या नमक हांडी येथे झाला. बालपणापासूनच धार्मिक वातावरणात रुळले. असल्याने त्यांचा ओढा भक्तीसंगीताकडेच राहिला होता. मोठ्या संघर्षानंतर त्यांना बॉलीवुडमध्ये काम मिळाले. त्यांनी बॉबी, बेनाम, रोटी, कपडा और मकान आदी सिनेमांतून पार्श्वगायन केले.
दरवर्षी करत वैष्णोदेवी यात्रा
त्यांनी आपल्या आत्मकथनात (Midnight Singer) आपल्या जीवनप्रवासाबद्दल त्यांनी लिहीले आहे. नरेंद्र चंचल प्रत्येक वर्षी २९ डिसेंबर रोजी वैष्णोंदेवी जात आणि वर्षाअखेरच्या दिवशी कार्यक्रमही सादर करत.