प्रसाद लाड यांनी घेतली राज्यपालांची भेट

    दिनांक  21-Jan-2021 20:57:14
|

prasad_1  H x W

मुंबई
: राज्यात कोरोनामुळे सर्व नवीन शैक्षणिक वर्षातले प्रवेशबाकी राहिले आहेत. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हळूहळू हे प्रवेश देखील सुरू झालेत. मात्र, त्यासाठी लागणारे जातपप्रमाणपत्र नसल्याने प्रवेश घेताना पालकांना व विद्यार्थ्यांना अडचणी येत आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी राज्यपालांची भेट घेत यात लक्ष घालून समस्या सोडवण्याची विनंती केली आहे.
 
 
 
ग्रामपंचायत निवडणूकामध्ये सरकारी यंत्रणा पूर्णपणे व्यस्त असल्याकारणाने बऱ्याच विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळू शकले नाही.त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या संबंधी भाजप महाराष्ट्र उपाध्यक्ष व विधानपरिषद आमदार प्रसाद लाड यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोशियारी यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने योग्य निर्णय घ्यावा असे आज निवेदन देत विनंती केली. यापूर्वी लाड यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना देखील याबाबत निवेदन दिले आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.