'तांडव'वर बंदी घालाच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2021
Total Views |
Tandav_1  H x W



ओबीसी महासंघाचा तांडवला विरोध


मुंबईअॅमेझोन प्राईमच्या तांडव या वेब सिरीजवरून देशभरामध्ये मोठा गदारोळ झाला. यामध्ये हिंदू देवी-देवतांवर केलेल्या टिप्पणीप्रकरणी निर्मार्ते, कलाकार, तसेच लेखकांवर कारवाई करण्याची मागणी हिंदू संघटना व भाजप कडून झाली, त्यावर दिग्दर्शक व निर्माते यांनी माफी मागितली. मात्र, आता या वेब सिरीजवर मागासवर्गीय संघटनांनी देखील आक्षेपार्ह मुद्दे टाकल्यामुळे विरोध करत निषेध केला.

 

तांडव वेबसिरीज ही एक पॉलिटिकल ड्रामा आहे. ही वेबसिरीज काहींच्या चांगलीच पसंतीला उतरत आहे. तर काहींच्या मते या वेबसिरीजद्वारे हिंदू व मागासवर्गीय धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हिंदू बंधावांच्या या वेबसिरीजमध्ये मोहम्मद जिशान आयुब याच्यावर चित्रित एका दृश्यावरुन हिंदू देवीदेवतांचा अपमान झाला असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी करत निर्मात्यांनी लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी हिंदू संघटनांनी आणि भाजपने निदर्शनं करत, तसेच समाज माध्यमांवर मोहीम राबवत केली.

 

यावरून इतका विरोध पाहता वेब सिरीजचे दिग्दर्शक व निर्मात्यांनी माफी मागितली व दृश्य काढून टाकू, असे सांगितले. त्यातच वेबसीरिजवर मागासवर्गीय बांधवांनी देखील आक्षेप घेत, त्यांच्या धर्माविरोधात या वेबसिरीजमध्ये आक्षेपार्ह मुद्दे आहेत, असं म्हणत त्या वेबसिरीज व निर्मात्यांचा निषेध केला आणि दृश्य काढून टाकण्यासाठी मागणीहीकेली आहे.

 

या आक्षेपार्ह दृश्याचा मी एक मागासवर्गीय म्हणून कडक शब्दात निषेध करते! अमेझॉन प्राईम' वर तांडव हि वेबसिरीज आली आहे. त्यामध्ये बहुजन आणि सवर्ण ह्यांच्यात तेढ निर्माण करणारे संवाद असून त्यामुळे दोंघांमध्ये संघर्ष सुरू होऊ शकतो. ह्या संवादांमुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावत आहेत.

 

बहुजन आणि सवर्ण ह्यांना ह्या मध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीने रंगविले गेले असून दोघांचाही वारंवार अपमान केला गेला आहे. हे कृत्य 'तांडव' चे लेखक 'गौरव सोळंकी' आणि निर्माते 'हिमांशू किशन मेहरा' ह्यांनी जाणून बुजून केलं आहे. ह्यांचा समाजामध्ये शत्रुत्व निर्माण करण्याचा हेतू आहे, हे स्पष्ट कळत आहे. तरी यातील आक्षेपार्ह संवाद तात्काळ काढून टाकावेत किंवा वेबसेरीजवर तात्काळ बंदी आणावी, अशी मागणी स्नेहल कांबळे महाराष्ट्र ओबीसी महासभा कार्याध्यक्षांनी केली आहे.





@@AUTHORINFO_V1@@