शिवसेनेने आता औरंगजेबाचीही जयंती साजरी करावी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2021
Total Views |

 
pande_1  H x W:


 


भापज उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्षांची टीका

 
 

मुंबई : शिवसेनना टिपू सुलतानची जयंती साजरी करणार असल्याचे वृत्त ऐकून मोठा धक्का बसला. ज्या टिपू सुलतानाने असंख्य हिंदू बांधवांचे सक्तीने धर्मांतर केले, अशा क्रूरकर्म्याची जयंती शिवसेना साजरी करणार आहे. सत्ता टिकविण्यासाठी शिवसेना औरंगजेबाची जयंतीही साजरी करायला मागेपुढे पाहणार नाही , असे भाजपा प्रदेश उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांनी शिवसेनेवर टीका करत म्हटले आहे.

 

संजय पांडे यांनी याबाबत म्हटले आहे की, टिपू सुलतानाचा इतिहास शिवसेनेला माहीत नसेल असे म्हणता येणार नाही. तरीही शिवसेना टिपूची जयंती साजरी करायला निघाली आहे. ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना हिंदुत्वासाठी लढणे शिकवले , त्याच शिवसेनेने टिपू सुलतानाची जयंती साजरी करावी यासारखी दुःखदायक गोष्ट नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी प्रसंगी सत्ताही लाथाडली त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला सत्तेसाठी कोणत्या थराला जावे लागते आहे हेच यातून दिसतं आहे . शिवसेनेने एवढ्यावरच थांबू नये , आता शिवसेनेने औरंगजेबाची जयंतीही साजरी करावी असं म्हणत शिवसेनेवर टीका केली आहे.

@@AUTHORINFO_V1@@