गाबावर भारतच 'अजिंक्य' ; ऐतिहासिक मालिका विजय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2021
Total Views |

Team India_1  H
 
नवी दिल्ली : भारतीय संघाने गाबा येथे झालेल्या कसोटी सामन्यात थरारक विजय मिळवत बॉर्डर- गावस्कर चषक आपल्या नावावर केला. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात दारूण पराभव मिळाल्यानंतर भारताने जोरदार वापसी करत मालिका २ - १ अशी खिशात घातली. यामध्ये अजिंक्य रहाणेच्या कर्णधारपदाखाली भारताने मिळवलेल्या या ऐतिहासिक विजयाचे कौतुक होत आहे.
 
 
सलामीवीर फलंदाज शुबमन गिलच्या ९१ धावा, 'दि न्यू वॉल' चेतेश्वर पुजाराच्या ५६ धावा आणि ऋषभ पंतच्या नाबाद ८५ धावा यांच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात ३ विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत २-१ ने बाजी मारली. भारतीय क्रिकेट संघाचे प्रमुख खेळाडू जायबंदी होत असताना अजिंक्यने मोठ्या कौशल्याने सहकाऱ्यांना सोबत घेऊन एकजुटीने कांगारूंचा सामना केला आणि ऐतिहासिक मालिका विजय प्राप्त केला.
 
 
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या होत्या. याचा पाठलाग करताना भारताने ३३६ धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३३ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर दुसऱ्या डावात मोहम्मद सिराज (५) आणि शार्दुल ठाकूर (४) या दोघांनी ९ विकेट्स बाद करत ऑस्ट्रेलियाला २९४ धावांवर रोखले आणि भारताला विजयासाठी ३२८ धावांचे लक्ष्य मिळाले. एकवेळ हे लक्ष्य अशक्य वाटत असताना संघाच्या मधल्या फळीने संयमी खेळी करत भारताला हा विजय मिळवून दिला.
 
 
ऑस्ट्रलियातील गाबा मैदानावर भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. गेली ३२ वर्ष ऑस्ट्रेलियाचा संघ या मैदानावर अजिंक्य होता. ऐतिहासिक विजय मिळवत भारताने या मैदानावर ऑस्ट्रेलियाला पराभवाची चव चाखायला लावली. याशिवाय गाबाच्या मैदानात चौथ्या डावात यशस्वी पाठलाग करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला. याआधी २३६ ही सर्वोत्तम धावसंख्या होती. भारताने हा विक्रम मोडीत काढला.
 
 
दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा मानहानीकारक पराभव झाला. यानंतर भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मेलबर्न येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ८ विकेट्स राखून विजय मिळवला. यानंतर हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी संयम आणि जिद्दीने फलंदाजी करत सिडनी येथील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखला. चौथ्या कसोटी सामन्यात सांघिक खेळ करत भारतीय संघाने विजय मिळवला आणि मालिका २-१ ने जिंकली.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@