मुंडे राजीनामा द्या , भाजप महिला मोर्चाचे आंदोलन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2021
Total Views |

bjp protest_1  
 
 
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर महिलेने आरोप केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे.नैतिकता दाखवत स्वतः धनंजय मुंडे राजीनामा देतील किंवा पक्ष त्यांचा राजीनामा मागवून घेईल अशी यावर सर्वप्रथम चर्चा होती. मात्र पक्षश्रेष्ठींनी याला पुष्टी दिली. त्यामुळे विरोधक आक्रमक होत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत आहेत.त्यातच आज भाजपच्या महिला मोर्चा यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबईत निदर्शने करत, त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा यासाठी िल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.
 
कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे गंभीर आरोप करत ,मला मदत करा अशी काही दिवसांपूर्वी पोलिसात तक्रार करत मागणी केली. मात्र नैतिकता पाहत पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली नाही . त्यामुळे भाजपने आक्रमक होत, त्यांच्याविरोधात आज राज्यभर राजीनामा द्या यासाठी आंदोलन केले होते. आज मुंबईत वांद्रे तहसीलदार कार्यालय येथे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे विरोधात बलात्कार आणि लैंगिक अत्याचारा विरोधात व निवडणूक आयोगाची व जनतेची फसवणूक केल्याने या घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यावा यासाठी भाजप मुंबई महिला मोर्चा च्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले व मुंडे यांच्या विरोधात निदर्शन करण्यात आली .यावेळी मंगलप्रभात लोढा-मुंबई अध्यक्ष, चित्रा ताई वाघ महाराष्ट्र उपाध्यक्ष, शीतल गंभीर देसाई महिला मोर्चा अध्यक्ष आणि महिला कार्यकर्ते उपस्थित होते.
 
धनंजय मुंडे यांनी २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना पत्नी जयश्री यांच्यापासून झालेल्या दोन अपत्यांची माहिती दिली आहे. मात्र विवाहबाह्य संबंधांतून झालेल्या दोन अपत्यांविषयी धनंजय मुंडे यांनी माहिती लपवली. तसेच विवाहबाह्य संबंध जपण्यासाठी आणि त्या संबंधांतून झालेल्या अपत्यांसाठी केलेल्या संपत्तीच्या तरतुदींविषयीची माहिती धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्जात नमूद केलेली नाही. या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आज निवेदन देत भाजपने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
 
राजकीय स्थानाचा गैरवापर करुन धनंजय मुंडे यांनी महिलेवर लैंगिक अत्याचार केले असल्याचा आरोप होत आहे. संबंधित महिलेच्या बहिणीने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायमंत्र्यांवरच एवढा गंभीर आरोप होत असेल तर त्यांनी आधी राजीनामा देणे आवश्यक आहे. पण ते देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा म्हणून आज त्यांच्या विरोधात आम्ही निदर्शनं करत , जिल्हाधिकार्‍यांना पत्र दिलेले आहे. या प्रकरणात चौकशी होईल. या चौकशीतून तथ्य पुढे येईल. पण निःपक्षपाती चौकशी होण्यासाठी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा. ते मंत्री असतील तर दबाव टाकून चौकशीवर प्रभाव पाडू शकतील, असे भाजपचे महिला मुंबई अध्यक्ष शीतल गंभीर यांनी आंदोलन करताना म्हटले.
@@AUTHORINFO_V1@@