मुंबई : रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या व्हायरल झालेल्या चॅटची पीडीएफ फाईल मुंबई पोलीसांनीच शोधून काढली असल्याचा दुजोरा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे. व्हॉट्सअप चॅट व्हायरल झाले कसे, असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून उपस्थित केला जात होता. पोलीसांनी टीआरपी प्रकरणात हा पुरावा तपासासाठी शोधून काढला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यातच व्हॉटसअप प्रायव्हसी पॉलीसीवरही अनेक जण संशय व्यक्त करत होते.
"मुंबई पोलिसांनी शोधून काढलेले अर्णब गोस्वामीचे चॅट अत्यंत गंभीर आहे. राष्ट्रीय सुरक्षेपासून ते घटनाबदल आणि राजकीय नेमणुकांची माहिती एका न्यूज अँकरला कशी मिळाली? केंद्र सरकारने या घटनेची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. संसदीय संरक्षण समितीनेदेखील या सर्व प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी.", अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.