'कॉंग्रेसने लसीवर टीका करून, शास्त्रज्ञांचा अपमान करू नये'

16 Jan 2021 15:15:22

covid vaccine_1 &nbs



मुंबई :
आज कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरणाला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सुरुवात झालेली आहे. यावर काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी टीका करत,काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र यावरून भाजप नेत्यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर देत सुनावले की, दहा महिन्यानंतर ही लस सर्वांना मिळत असताना देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. मात्र काँग्रेस राजकारण करत आहे. काँग्रेसला राजकारण करायचे तर दुसऱ्या विषयावर करा, शास्त्रज्ञांचा अपमान करू नका असे म्हणत भाजपने काँग्रेसला खडे बोल सुनावले आहेत.



काँग्रेस नेत्यांनी लसीवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपचे नेते राम कदम यांनी म्हटले की,गेल्या दहा महिन्यापासून संपूर्ण देशाला कोरोनाच्या लसीची आतुरता होती.संपूर्ण देश विचारात होता. कोरोनावर लस कधी येईल याची आतुरतेने वाट पाहत होता. 'आत्मनिर्भर भारत मोहिमे'अंतर्गत आपल्या वैज्ञानिकांनी भारतीय बनावटीची लस तयार केली. जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला आज सुरुवात झाली. सर्वात मोठी लसीकरण मोहीमेला आजपासून आपल्याकडे प्रारंभ झाले आहे.लोकांच्या मनात आनंद आहे,काँग्रेसला वाटत नाही लोकांना वॅक्सीन मिळावं , काँग्रेसचे नेते यावर प्रश्न चिन्ह उपस्तिथ करून देशातील शास्त्रज्ञांचा अपमान करत आहेत . तुम्हाला राजकारण करायचं असेल तर दुसऱ्या मुद्द्यांवर करा तुम्हाला दुसरे मुद्दे मिळतील. यावर राजकारण करू नका असे भाजप नेते राम कदम यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर करत म्हटले आहे
Powered By Sangraha 9.0